कांद्याचे दर उतरले, भाजीपाल्यांचे दर स्थिर

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 2 नोव्हेंबर 2020

महापालिकेच्या मार्केटमधील खुल्या भाजीपाला विक्रेत्यांकडे गेली दोन दिवसांपासून कांद्याचे दर उतरल्याचे दिसून आले. मागील आठवड्यात शंभरी गाठलेल्या कांद्याचे दर झर्रकर ३० रुपयांनी घसरले आहेत.

पणजी :  महापालिकेच्या मार्केटमधील खुल्या भाजीपाला विक्रेत्यांकडे गेली दोन दिवसांपासून कांद्याचे दर उतरल्याचे दिसून आले. मागील आठवड्यात शंभरी गाठलेल्या कांद्याचे दर झर्रकर ३० रुपयांनी घसरले आहेत. परंतु इतर भाजीपाल्यांचे दर मात्र स्थिर असल्याचे दिसून आले आहेत. 

मागील आठवड्यात कांद्याची आवक घटल्याने दर शंभरीपर्यंत गेले होते. परंतु केंद्र सरकारने कांद्याची आयात केली आणि तो कांदा बाजारात येण्यापूर्वीच त्याचे दर खाली आले. केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी उठविली नाही, पण परदेशातून कांदा आयात केल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे. त्यामुळे काही शेतकऱ्यांनी कमी प्रमाणात कांदा बाजारात आणण्यास सुरुवात केल्याचे चित्र काही दिवसांपूर्वी दिसले. त्यामुळे गोव्यात परराज्यातून येणाऱ्या कांद्याचे दर उतरल्याने येथे विक्रेत्यांकडून ग्राहकांपर्यंत पोहोचेपर्यंत तो दर ७० रुपये झाला. 

इतर भाजीपाल्यांच्या दराची मागील आठवड्यातील दराशी तुलना केली तर ते दर स्थिर असल्याचे दिसून आले. त्यामुळे अद्याप इतर भाजीपाल्यांच्या दराची मात्र सामान्यांना चिंता लागून लागणार आहे. अजूनही कोथिंबीरची जुडी ३० रुपयांनाच घ्यावी लागत आहे. भेंडी, गवार ८० रुपये किलोने विकली जात असल्याने ते दर आवक वाढलीतरच कमी होतील, असे येथील विक्रेत्यांचे म्हणणे आहे. 

संबंधित बातम्या

Tags