नवचेतना युवक संघातर्फे ऑनलाईन अभंग गायन स्पर्धा

प्रतिनिधी
बुधवार, 26 ऑगस्ट 2020

जागतिक स्तरावर कोविड महामारीच्या पार्श्वमीवर यंदा पारंपरिक भजन स्पर्धा होऊ शकल्या नाहीत.

पेडणे:  जागतिक स्तरावर कोविड महामारीच्या पार्श्वमीवर यंदा पारंपरिक भजन स्पर्धा होऊ शकल्या नाहीत. त्यामुळे पेडणे तालुक्यातील भजनी कलाकारांसाठी व्यासपीठ मिळवून देण्यासाठी ‘नवचेतना युवक संघ पेडणे’ या संस्थेने कै. प्रतिभा प्रभाकर धामस्कर स्मृती पेडणे तालुका मर्यादित खुल्या ऑनलाईन अभंग गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष कृष्णा पालयेकर यांनी पेडणे येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. यावेळी संयोजक गौरेश पेडणेकर, साहिल सावंत उपस्थित होते.

स्पर्धेची नाव नोंदणी सुरू झालेली आहे. स्पर्धेत सहभागी होण्याची (नाव नोंदवायची) अंतिम तारीख ३१ ऑगस्ट आहे. त्यानंतर व्हिडिओ स्वीकारले जाणार नाहीत. स्पर्धेत  सहभागी होण्यासाठी ७२१९०९९३८८ या व्हॉट्सअप क्रमांकावर स्पर्धकांनी आपली नाव नोंदणी करावी व आपले चित्रीकरण पाठवावे.

स्पर्धेतील विजेत्यांना प्रथम - १३०० रु., द्वितीय -  १२००  रु., तृतीय - १००० रु. अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत. तसेच ५००  रुपयांची तीन उत्तेजनार्थ बक्षिसे देण्यात येणार आहेत.

स्पर्धेसाठी  अभंग जास्तीत जास्त ५ मिनिटांचा असावा. व्हिडिओ पाठवताना अभंगाचे नाव, गायकाचे नाव, साथीदारांचे नाव, राहण्याचे ठिकाण आदी माहिती पाठवावी. अधिक माहितीसाठी ७०५७१९३७६४ किंवा ७९७२७१८६२९ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आयोजकांतर्फे कळविण्यात आले आहे.

संबंधित बातम्या