कुडचडेत ऑनलाईन ‘कला आविष्‍कार’ स्‍पर्धा

कुडचडेत ऑनलाईन ‘कला आविष्‍कार’ स्‍पर्धा

कुडचडे, 

कोरोना संसर्गाच्या काळातही कलाकारांच्या कृतिशीलतेला चालना मिळावी, या उद्देशाने रवींद्र भवन कुडचडेतर्फे ‘कला आविष्कार’ या मथळ्याखाली ऑनलाईन स्पर्धा आयोजित केल्या आहेत.
नाट्यलेखन, कविता सादरीकरण आणि छायाचित्रण अशा तीन विभागात ‘कोविड -१९’ या मुख्य सूत्राखाली विविध विषयावर ह्या स्पर्धा घेण्यात येतील. नाट्य संहितालेखन ही स्पर्धा अखिल गोवा पातळीवर तर कविता सादरीकरण आणि छायाचित्रण स्पर्धा सांगे केपे तालुका मर्यादित असतील. नाट्यलेखनासाठी ‘कोविड - १९’ आणि ज्‍येष्ठ नागरिक, कोविड-१९ मुळे अडकून पडलेल्या नागरिकांची व्यथा, देशाबाहेरील गोमंतकीय आणि संचारबंदी पूर्व आणि संचारबंदी नंतरचे जग असे विषय देण्यात आले आहेत. सुमारे दोन तास चालणारी नाटकाची ही संहिता अपेक्षित असून किमान पन्नास ते साठ पाने लिखित स्वरूपात रवींद्र भवन कुडचडेच्या पत्यावर पाठवाव्या लागतील. नाट्यसंहिता लेखन स्पर्धेसाठी पहिले रु. १० हजार, दुसरे रु. ७ हजार, तिसरे रु. ५ हजार, अशी बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.
सांगे केपे तालुका मर्यादित कविता लेखन आणि सादरीकरण स्पर्धेत कोविड -१९ या विषयावर स्वलिखित कविता सादरीकरण करून त्याची ऑडिओ प्रत आणि लिखित प्रत रवींद्र भवनच्या वेबसाईटवर अथवा अधिकृत फेसबूक पेजवर पाठवावी. स्पर्धेसाठी पहिले बक्षिस रु. ५ हजार, दुसरे रु. ३ हजार, तिसरे रु. २ हजार, व चौथे रु. १ हजार अशी बक्षिसे देण्यात येतील.
छायाचित्रण स्पर्धेसाठी संचारबंदीच्या काळातील जीवन, संचारबंदी नंतरचे जीवन आणि कोरोनाशी सहजीवन असे विषय देण्यात आले असून स्पर्धेसाठीचे छायाचित्र रवींद्र भवनच्या वेबसाईटवर पाठवावे. सदर स्पर्धेसाठी पहिले बक्षिस रु. ७ हजार, दुसरे रु. ५ हजार, तिसरे रु. ३ हजार, अशी बक्षिसे असतील. अधिक माहितीसाठी २६५३०८३ या क्रमांकावर सर्पक साधावा. या उपक्रमास इच्छुक नाट्यलेखक, कवी आणि छायचित्रकारांनी सहभागी व्‍हावे, असे आवाहन रवींद्र भवनचे अध्यक्ष नीलेश काब्राल, उपाध्यक्ष राजू नायक, आणि सचिव अजय गावडे यांनी केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com