महाविद्यालय ऑनलाईन प्रवेश आजपासून 

online admission
online admission

पणजी

कोविड - १९ च्या पार्श्‍वभूमीवर राज्यात लागू असलेल्या टाळेबंदीमुळे गोव्यातील महाविद्यालयातील प्रवेशासाठी राज्यात पहिल्यांदाच समान ऑनलाईन प्रवेश पद्धत अवलंबिण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ऑनलाईन प्रवेशासंदर्भातचे
पोर्टल उद्या (१५ जुलै) पासून सकाळी ९ वाजल्यापासून खुले केले जाणार आहे. 
टाळेबंदीमुळे राज्यातील शाळा व महाविद्यालये वेळेवर सुरू न झाल्याने अभ्यासक्रमामध्ये कपात केली जाणार आहे का असा प्रश्‍न मुख्यमंत्री डॉ. सावंत यांना केला असता ते म्हणाले की, या प्रवेशासाठी उच्च शिक्षण खात्याने प्रक्रिया तयार केली आहे. गोवा शालांत मंडळ व गोवा विद्यापीठ हे अभ्यासक्रमात कपात करण्यासंदर्भात निर्णय घेण्याचे त्यांना पूर्ण स्वतंत्र आहे. त्यामध्ये सरकार कोणताही हस्तक्षेप करणार नाही. शालांत अभ्याक्रमासंदर्भात गोवा शालांत मंडळ तर महाविद्यालय अभ्यासक्रम गोवा विद्यापीठ ठरवणार आहे, असे त्यांनी सांगितले. 
राज्यातील सरकारी तसेच अनुदानित महाविद्यालये हे उच्च शिक्षण खात्याच्या प्रशासनाच्या नियंत्रणाखाली येत असल्याने ही प्रवेश प्रक्रिया मध्यवर्ती ऑनलाईन पद्धतीने केली जाणार आहे. या अभ्यासक्रमामध्ये बीए, बीकॉम, बीएस्सी, बीबीए, बीसीए, गृहविज्ञान, कृषी, बीए बीएड, बीएस्सी बीएड व इतरांचा समावेश आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी https://www.dhe.goa.gov.in/ या समान पोर्टलवर अर्ज करावेत. या पोर्टलमध्ये ऑनलाईन अर्ज सादर करण्यासंदर्भातच्या आवश्‍यक मार्गदर्शक सूचना विद्यार्थ्यांना उपलब्ध करण्यात आल्या आहेत. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com