गिफ्टचं आमिष दाखवत घातला 5 लाखांचा गंडा
Online FraudDainik Gomantak

गिफ्टचं आमिष दाखवत घातला 5 लाखांचा गंडा

सायबर गुन्हे शाखेकडून फसवणुकीप्रकरणी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल

पणजी : ऑनलाईन ओळख झालेल्या व्यक्तीकडून गिफ्ट पार्सल मिळवण्याच्या आमिषाने सिकेरी कांदोळी येथील महम्मद फिरोज या तरुणाला 5 लाख रुपयांना मुकावे लागले. सायबर गुन्हे शाखेने फसवणुकीप्रकरणी तक्रार नोंद करून अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Online Fraud
‘ओडीपी’संकेतस्थळावर उपलब्ध करण्याचे निर्देश

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार फिरोजची एका अनोळखी व्यक्तीशी ऑनलाईन ओळख झाली. एकमेकांशी ऑनलाईनवरून व्यक्तीने संवाद सुरू केला होता. फिरोजला गिफ्ट पाठवत असल्याचे सांगितल्यानंतर काही दिवसांनी ते पार्सल क्लियरन्समुळे अडकल्याचे सांगून रक्कम जमा करण्यास सांगितले. त्यासाठी त्याने त्याचा खाते क्रमांक दिला. तक्रारदाराने पैसे जमा केले तरी हे गिफ्ट पोहचले नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्याने पोलिसात तक्रार दिली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com