Online Fraud: बिल भरा अन्यथा विज खंडित केली जाईल; नागरिकांची फसवणूक थांबेना

''फसवणूक रोखण्यासाठी टोल फ्री हेल्पलाइन 1912 वर किंवा 0832-2490800 वर संपर्क साधा''
Online Fraud
Online FraudDainik gomantak

गेल्या अनेक महिन्यांपासून गोवा राज्यात नागरिकांची विजबिल भरणा करण्याच्या बहाण्याने ऑनलाईन लूट सुरु आहे. याबाबत राज्यातील नागरिकांना त्यांचा वीज पुरवठा खंडित करण्याचे धमकावत ऑनलाइन पेमेंट करण्यास सांगणारे फसवणूक संदेश सुरुच असून ते थांबलेले नाहीत.

(Online fraudsters target goa consumers over power disconnection)

Online Fraud
Goa news: भाजप आमदार गणेश गावकर यांची प्रकृती स्थिर; खासगी दौऱ्यानिमित्त आहेत श्रीलंकेत

मिळालेल्या माहितीनुसार 'या' नंबरवर आपले विजबिल भरा अन्यथा आपले विज कनेक्शन बंद केले जाईल असे फेक संदेश येत आहेत. असाच संदेश फातोर्डा येथील एका ज्येष्ठ नागरिकाला प्राप्त झाला आहे. तो एसएमएस असा होता,

सूचना. प्रिय ग्राहक तुमची वीज खंडित केली जाईल. आज रात्री 9.30 वाजता वीज कार्यालयातून तुमचे मागील महिन्याचे बिल अपडेट झाले नव्हते. कृपया आमच्या वीज अधिकारी 9641325400 शी त्वरित संपर्क साधा”

Online Fraud
Goa Water Problem: डिचोली येथे पाणीटंचाई कायम; तर मुळगावात पाण्याची नासाडी

वीज विभागाने ग्राहकांना केले सावध

वीज विभागाने या वर्षी मार्चमध्ये वीज पुरवठा खंडित करण्याच्या फसवणुकीच्या संदेशांविरुद्ध ग्राहकांना सावध केले आहे. आणि फसवणूक करणाऱ्यांनी पाठवलेल्या कोणत्याही लिंकवर कोणतेही पेमेंट करू नका किंवा त्यांच्यासोबत कोणतेही तपशील शेअर करु नका असा इशाराही दिला.

टोल फ्री हेल्पलाइनवर साधा संपर्क

वीज पुरवठा त्वरित खंडित करण्यासाठी वीज विभाग एसएमएस किंवा व्हॉट्सअॅपद्वारे असे कोणतेही संदेश पाठवणार नाही. ग्राहकांना फसवणूक होत असल्याचा संशय असल्यास विज खात्याच्या टोल फ्री हेल्पलाइन 1912 वर किंवा 0832-2490800 वर संपर्क साधावा असा सल्ला दिला आहे.

वीज विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, आम्ही पणजी पोलिस स्टेशनमध्ये दोन पोलिस तक्रारी दाखल केल्या आहेत आणि सायबर क्राइम विभाग या प्रकरणाचा शोध घेत आहे. विज विभाग सोशल मीडियावर सावधगिरीचे संदेश देखील शेअर केले आहेत. परंतु नागरिक अजूनही बळी पडत असल्याचं म्हटलं आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com