बेतोड्यात ऑनलाईन जुगारावर छापा
gambling zoneDainik Gomantak

बेतोड्यात ऑनलाईन जुगारावर छापा

मध्यरात्री कारवाई : संगणक साहित्यासह 50 हजारांची रोकड जप्त

पणजी : बेतोडा - फोंडा येथील गीता बार अँड रेस्टॉरंटजवळ एका दुकानात मध्यरात्रीच्यावेळी सुरू असलेल्या ऑनलाईन जुगारावर गुन्हा अन्वेषण विभागाच्या गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून चौघांना अटक केली. पोलिसांनी या कारवाईवेळी जुगाराचे साहित्य व संगणक उपकरणे तसेच रोख रुपये 50,500 जप्त केली. ही कारवाई पोलिस उपअधीक्षक राजू राऊत देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अटक करण्यात आलेल्यांची नावे सरोज कुमार सहा (33, कुंकळ्ळी), सतिश रजपूत (34, कुंकळ्ळी), उल्हास कृष्णा सावंत (फोंडा) व सिब भास्कर बुयान (31, ओरिसा) अशी आहेत. त्यांच्याविरुद्ध जुगार प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल करून चौकशी करण्यात येत आहे.

gambling zone
दागिने हिसकावणाऱ्या तोतया पोलिसांचा सुळसुळाट

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या काही दिवसांपासून गुन्हे शाखेने जुगारविरोधात मोहीम सुरू केली आहे. बेतोडा - फोंडा येथील एका दुकानात रात्रीच्यावेळी ऑनलाईन जुगार सुरू असल्याची माहिती पोलिस खबऱ्यांकडून मिळाली होती. या माहितीची शहानिशा करण्यात आली व त्यानंतर पूर्णतयारीनिशी पोलिस पथक घेऊन काल रात्री 10.45 वा. घटनास्थळी पोहचले, तेव्हा दुकानामधील संगणकावर ऑनलाईन जुगार सुरू होता व आतमध्ये तरुण होते. या तरुणांना ताब्यात घेऊन केलेल्या झडतीत त्यांच्याजवळ रोख रक्कम सापडली. तसेच दुकानात काही प्रमाणात रक्कम होती ती जप्त करण्यात आली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com