म्हादईप्रश्नी आज सर्वोच्च न्यायालयात ऑनलाईन सुनावणी

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 22 फेब्रुवारी 2021

गोवा सरकारने सर्वोच्च न्यायालयात म्हादई प्रश्नावर प्रत्यक्ष हजर राहून सुनावणीसाठी आग्रह धरला असला, तरी सुप्रीम कोर्ट आज म्हादई प्रश्नावर ऑनलाईन सुनावणी घेणार आहे.

पणजी : गोवा सरकारने सर्वोच्च न्यायालयात म्हादई प्रश्नावर प्रत्यक्ष हजर राहून सुनावणीसाठी आग्रह धरला असला, तरी सुप्रीम कोर्ट आज म्हादई प्रश्नावर ऑनलाईन सुनावणी घेणार आहे. याप्रकरणी गोवा सरकारने अवमान याचिका दाखल केली असून गोवा, महाराष्ट्र आणि कर्नाटक यांनी म्हादेई प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात विशेष अपिल याचिका दाखल केली आहे. दरम्यान, कोरोनामुळे सर्वोच्च न्यायालयाला जवळपास एक वर्ष प्रत्यक्ष सुनावणी घेता आलेली नाही.

गोव्यात गेल्या तीन महिन्यांत झाल्या 300 पोलिसांच्या बदल्या

म्हादई जल विवाद न्यायाधिकरण (एमडब्ल्यूडीटी) ने 14 ऑगस्ट 2018 रोजी झालेल्या म्हादई पाणी वाटपाच्या आधारे कोणतीही कृती करण्यास कर्नाटक आणि महाराष्ट्र यांना रोखण्याचे निर्देश गोव्याच्या एसएलपीत नमूद केले आहेत. गोव्याने सर्वोच्च न्यायालयात कर्नाटकला मलप्रभा नदीच्या खोऱ्यातून म्हादईचे पाणी वळवून घेण्यापासून रोखण्याचे आदेश देण्याची विनंती केली आहे. विवाद न्यायाधिकरणातील केंद्रीय जल आयोगाच्या मुख्य अभियंतास्तरीय अधिकाऱ्यांपैकी पॅनेलच्या अध्यक्षस्थानी असलेल्या गोवा, महाराष्ट्र आणि कर्नाटकातील अधिकाऱ्यांनी गोवा सरकारने कणकुंबी येथील जागेच्या संयुक्त तपासणीसाठी निर्देश मागितले आहेत.

गोव्यात कोरोना नियंत्रीत; महाराष्ट्राच्या पार्श्वभूमीवर सतर्कतेचा इशारा

 20 फेब्रुवारी 2020 च्या कोर्टाच्या आदेशानुसार केंद्र सरकारने 27 फेब्रुवारी 2020 रोजी म्हादेई जल विवाद न्यायाधिकरणाचा अहवाल जाहीर केला आहे. मात्र, कर्नाटकने कलस्सा नाला मलाप्रभामध्ये वळविल्याची माहिती मिळताच न्यायाधिकरणाने हा अहवाल देण्यापूर्वी गोव्याने सर्वोच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल केली होती.

संबंधित बातम्या