ऑनलाईन शिक्षण : शक्यता आणि अडचण

ऑनलाईन शिक्षण : शक्यता आणि अडचण
ऑनलाईन शिक्षण : शक्यता आणि अडचण

शाळेत शिकवताना काही उपक्रम हे प्रत्यक्ष मुलांच्या उपस्थितीत आणि शिक्षकांच्या देखरेखीखालीच करावे लागतात. ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून उपक्रम घेता येत नसल्याने मर्यादा येतात. शाळेत शिक्षक शिकवताना विद्यार्थ्यांचे शिकवण्याकडे किती लक्ष आहे? विद्यार्थी काय करत आहेत? हे समजते.

कोरोना आल्यापासून जगाचे वातावरण बदलून सगळीकडे जसा कहर मांडलेला दिसत आहे. महामारीच्या वेगाने वाढणाऱ्या गतीमुळे शिक्षण क्षेत्रावर प्रभाव पडला असून, शिशू वर्गापासून ते महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी कसे शिकावे? हा प्रश्‍न पालक-शिक्षकांना पडला आहे. शिवाय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसमोर शिक्षण अपूर्ण राहिल्याची चिंता असून भविष्याचा प्रश्‍न उभा आहे. त्यामुळे सरकारने ‘ऑनलाईन शिक्षणाची’ संकल्पना उभारली असून त्यात उगम भरला आहे.

ऑनलाईन शिक्षणाच्या संकल्पनेमुळे शिक्षणाला नाविन्यता लाभल्याने शिक्षकांना नवीन प्रशिक्षण घेणे भाग पडले आहे. विद्यार्थी वर्गाला नाविन्यतेने शिकणे क्रमप्राप्त झाले आहे. ऑनलाईन शिक्षणाच्या संकल्पनेविषयी ज्या लोकांना माहिती नव्हती त्यांना देखील या संकल्पनेविषयी ज्ञान प्राप्त झाले. परंतु कोणतीही नवीन संकल्पना सुरू करताना त्यात शक्यता आणि अडचणी नक्कीच असतात. ऑनलाईन शिक्षणाच्या बाबतीत "श्री गणेशा' झाला असला तरीही त्यात अनेक अडचणी असल्याने त्यात सुधारणा करणे महत्त्वाचे आहे.

काही मुलांना त्यांच्या आई-वडिलांकडून पूर्णपणे सुविधा मिळतात. पण काही मुलांना मिळत नाहीत आणि त्या मागील मुख्य कारण म्हणजे आर्थिक परिस्थिती. पण असं असूनही त्यांचे आई-वडिल स्वतःच्या पोटाला चिमटा काढून पै-पै जमवून आपल्या मुलांच्या गरजेचा विचार करून धडपडतात. मात्र ऑनलाईन शिकण्याची सुविधा, साधने उपलब्ध नसल्यास मुलांना शिक्षण कसे मिळणार? हा प्रश्‍न त्यांच्यासमोर आहे. 

ऑनलाईन शिक्षणाची संकल्पना उत्तम असली तरीही मोठी कठीण आहे. कारण ही  संकल्पना सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचू शकत नाही. शहरामध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांना इंटरनेटचा त्रास नसतो. परंतु गावात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना त्याचा मोठा त्रास असल्याने त्या परिस्थितीत ऑनलाईन शिक्षण घेणे त्यांना कसं शक्य आहे? यावर विचार करणे महत्त्वाचे आहे.

शाळेत शिकवताना काही उपक्रम हे प्रत्यक्ष मुलांच्या उपस्थित राहून आणि शिक्षकांच्या देखरेखीखालीच करावे लागतात. परंतु ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून उपक्रम घेता येत नसल्याने मर्यादा येतात.तसेच शाळेत शिक्षक शिकवताना विद्यार्थ्यांचे शिकवण्याकडे किती लक्ष आहे? विद्यार्थी काय करत आहेत? हे त्यांच्या चेहऱ्याच्या हावभावा वरून जाणवते. परंतु ऑनलाईन वर्ग घेत असताना विद्यार्थी काय करत आहेत? तसेच त्यांचे अभ्यासात किती लक्ष आहे? याचा तर्क लावणे कठीण होते.

आजच्या कठीण परिस्थितीत एकत्र येऊन वर्गात शिकवणे किंवा शिक्षण घेण्यास कठीण असल्याने आम्हाला तंत्रसाधनांचा वापर करून त्या सावलीतून चालावे लागणार आहे, परंतु ऑनलाईन शिक्षणाविषयी अनेक प्रश्‍न उपस्थित केल्याने त्याला नकार आहे असं नसून केलेल्या नवीन अडचणी व तोट्यांवर अभ्यास करून पुन्हा नाविन्यता आणण्याची गरज आहे. 

सर्वात मुख्य ऑनलाईन शिक्षणाच्या नावाखाली लहान पाल्यांच्या  हाती तंत्रसाधन दिल्यास त्यांच्यावर लक्ष ठेवणे हे पालकांचे कर्तव्य असून त्यांना पुस्तक वाचन आणि इतर खेळांत आवड निर्माण करणे महत्त्वाचे आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com