२ जुलै रोजी ऑनलाइन मेडिएशन कार्यशाळा

dainik gomantak
मंगळवार, 30 जून 2020

या कार्यशाळेला सुरळीतपणा आणण्यासाठी अनिता रायकर या हि कार्यशाळा मोइरा येथून आणि संतोष घोडगे आणि संगीता हेगडे हे मडगावमधून, मिथीली काकोडकर आणि स्वर्ण लक्ष्मी हे साशष्टीमधून आणि, पूर्वा परब आणि नीला नावेलकर हे पणजीमधून आणि स्वाती बुवाजी या केपेमधून कार्यरत राहणार आहेत.

पणजी,
भारतासारख्या देशात योग नेहमीच समाजाचा महत्वाचा भाग आहे. शारीरिक आणि मानसिक आरोग्यासह विविध फायद्यांसाठी जगभरात योगाचा अढळ अभ्यास केला जातो. सध्याची परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत चालली आहे ज्यामुळे तणाव आणि ताणहीदेखील वैयक्तिक पातळीवर आणि मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अशा गंभीर परिस्थितीत, योगाच्या मदतीने आपण अशा वेळी शांत आणि संयमित राहण्याचा प्रयत्न करायला हवा. या हेतूने, आर्ट ऑफ लिव्हिंग ही संस्था सामाजिक हिताच्या दृष्टीने ऑनलाईन ब्रीथ अ‍ॅण्ड मेडिएशन कार्यशाळा
आयोजित करीत आहे.
गुरू पौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर २ ते ५ जुलै, २०२० या कालावधीत ऑनलाईन ब्रीथ अ‍ॅण्ड मेडिएशन कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. सोमवार ते शनिवार सायंकाळी दोन तास आणि रविवारी सकाळी १० ते १ वाजेपर्यंत हे वर्ग परमपूज्य श्री श्री रविशंकर घेणार आहेत. यासाठी तुम्ही आर्ट ऑफ लिव्हिंगचे वेब पोर्टल https://www.artofliving.org/in-en/goa येथे नोंदणी करु शकता.
कार्यशाळेत सुदर्शन क्रिया शिकण्यासाठी आणि त्या अभ्यासासाठीही मार्गदर्शन केले जाईल. असंख्य श्वास घेण्याच्या शारिरीक तंत्राचे असंख्य शारीरिक आणि मानसिक फायदे आहेत हे सिद्ध झालेच आहे. सुदर्शन क्रिया हा या वेबकार्यशाळेचा मुख्य घटक आहे, ज्यामुळे विषाणूसोबत लढण्यासाठी प्रतिकारशक्ती सुधारते, तणाव त्वरित आणि प्रभावीरित्या कमी होतो, तीव्र विश्रांती आणि झोपेची गुणवत्ता सुधारते, लक्ष केंद्रित करण्यास तसेच स्मरणशक्ती आणि निरोगी आरोग्य प्राप्त करण्यास मदत होते. हे तंत्र आपली मानसिक स्थिती सुधारण्यास
तसेच रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यात देखील मदत करते. यावर झालेल्या स्वतंत्र संशोधनात यामुळे तणाव संप्रेरकातील घट होत असल्याचे सिद्ध झाले आहे. जीवनात समाधानीपणा आणि रोगप्रतिकारक पेशींच्या संख्येत वाढ सुदर्शन क्रियेच्या माध्यमातून होतेच पण अधिक चांगली झोप आणि उच्च उर्जा पातळीही यामुळे वाढण्यास मदत
होते.

 

संबंधित बातम्या