तपोभूमीद्वारे ऑनलाईन पुरोहित सेवा

PUJA
PUJA


खांडोळा,

श्री दत्त पद्मनाभ पीठ, पीठाधीश्वर, आध्यात्मिक धर्मगुरु धर्मभूषण ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजींच्या कृपाशीर्वादाने श्री दत्त पद्मनाभ पीठ विश्वाला सुशिक्षित, सुसंस्कारित बनवून ऋषिमुनींचा वारसा पुढे नेण्यासाठी वैदिक सनातन हिंदू धर्माचे कार्य धर्मसेवेच्या माध्यमातून मोठ्या जोमाने करीत आहेत. गोमंतकामध्ये वेद, संस्कृत, ज्योतिष, वास्तू, संगीत, योग आदि पुरातन शास्त्रांचे ज्ञान प्रदान करणारी ज्ञानगंगोत्री अर्थातच श्री क्षेत्र तपोभूमी. प्रत्येक हिंदूधर्मियांच्या गृहस्थाश्रमामध्ये पुण्यवृद्धी व्हावी, समाजामध्ये सात्त्विकता वाढावी, धार्मिक गोष्टीचे ज्ञान समाजाला व्हावे, ही संकल्पना घेऊन संपूर्ण गोमंतकामध्ये २१ जुलैपासून श्रावणोत्सव प्रारंभ होत आहे. यावर्षी कोरोना महामारीच्या प्रादुर्भावामुळे श्रावणोत्सव प्रत्यक्ष पुरोहिताद्वारे होऊ शकणार नाही, त्यामुळे धर्मसेवेद्वारे ऑनलाइन पुरोहित सेवा आपण सर्वासाठी उपलब्ध होत आहे, पुढे दिलेल्या वेबसाईटवरुन www.srigurudev.org किंवा https://forms.gle/Ft3tNWhNnmZuUuTg9 या लिंकवर विविध सर्व विधींची सविस्तर माहिती दिलेली आहे. तरी श्रावणोत्सव विधीसाठी आपण आपली नाव नोंदणी या लिंकद्वारे करु शकता.
यावर्षी अजून एक नवीन सुलभ ऑनलाइन उपक्रम सुरू होतो आहे, तो म्हणजे ऑनलाइन वर्ग, गणेश चतुर्थी प्रीत्यर्थ श्रीगणेश पूजा विधी वर्ग सुरू करण्यात आले आहे, यासाठी www.srigurudev.org या वेबसाईटवरुन नोंदणी करता येणार आहे. ऑनलाईन वर्गाच्या उपक्रमाप्रमाणे धर्मसेवे च्या माध्यमातून भावी काळात अजूनही कोर्स अंतर्भूत केले जाणार आहेत, त्याची सविस्तर माहिती लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार आहे, असे सर्व धार्मिक विधी संपन्न करून पुण्यार्जन करण्याची व ज्ञानार्जन करण्याची सुसंधी गोमंतकीयांना प्राप्त होत आहे.
जनसमुदायामध्ये पुण्यार्जन करून समाजात शांती तथा एकता निर्माण व्हावी हा या मागचा मुख्य उद्देश आहे. हा श्रावणोत्सव मोठ्या उत्साहाने व भक्तिभावाने साजरा करून गोमंतकाचे खरे दर्शन संपूर्ण जगाला दाखवून गोमंतकभूमीची खरी ओळख प्रस्थापित होणार आहे, अशा ऑनलाइन सेवेचा लाभ घ्यावा,असे आवाहन समस्त गोमंतकीयांना श्री दत्त पद्मनाभ पीठातर्फे करण्यात येत आहे. अधिक माहितीसाठी ७५०७७७१७४१ / ७५०७७७१५६९ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे तपोभूमीतर्फे आवाहन करण्यात आले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com