70 पैकी 10 टक्केच पाणी गोव्याला!

तिळारी प्रकल्प : जीवनदायिनी संस्थेच्या पाहणीनंतर माहिती उघड
Limited water in Goa
Limited water in Goa Dainik Gomantak

मोरजी: महाराष्ट्रात तिळारी धरण प्रकल्प उभारताना त्याचा 70 टक्के खर्चाचा भार गोवा सरकारने उचलला होता. त्यानुसार 70 टक्के पाणी गोव्याला सोडण्यासंदर्भातचा करारही झाला होता, परंतु प्रत्यक्षात 10 टक्केच पाणी गोव्याला सोडण्यात येत असल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे.

हणखणे - सासोली येथील तिळारी कालव्याच्या मुख्य जंक्शनला आज जीवनदायिनी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केल्यानंतर ही माहिती उघड झाली आहे.

जलसिंचन खात्याने तिळारी प्रकल्पातून येणारे पाणी नियमित आणि गोवा राज्यासाठी ठरलेला 70 टक्के वाटा आहे तो का पुरवला जात नाही याची चौकशी करावी, अशी मागणी जीवनदायिनी संस्थेचे अध्यक्ष नाना ऊर्फ नारायण सोपटे केरकर, भास्कर नारुलकर, उदय महाले, करिष्मा गाड, दयानंद मांद्रेकर, बया वरक, सागर गाड, विठोबा बगळी आदींनी हणखणे - सासोली या ठिकाणी पाहणी केल्यानंतर पत्रकारांना त्यांनी ही माहिती दिली.

Limited water in Goa
मडगावात सोमवारपासून सुरू होणार मॉन्सूनपूर्व कामे

तिळारीच्या पाण्याचा पेडण्यात वापर करावा तिळारी प्रकल्पाकडे गोवा राज्याचे मुबलक पाणी असताना जलसिंचन खाते सध्या वेगवेगळ्या माध्यमांतून नद्यांचे पाणी वळवण्याचा प्रयत्न करत आहे. तो प्रयत्न करण्यापूर्वी तिळारीचे पाणी जे आजपर्यंत सोडलेले नाही ते मिळवून टप्प्याटप्प्याने पेडणे तालुक्यातील प्रकल्पांना पुरवठा करावा, अशी मागणी जीवनदायिनी संस्था व नागरिक करीत आहेत

Limited water in Goa
सत्तरीत डेंग्यूचे 30 संशयित रुग्ण!

गोव्याचे पाणी महाराष्ट्राला!

तिळारी प्रकल्पातून अगोदरच गोवा राज्याला कमी प्रमाणात पाणी सोडले जाते. जो राज्याचा कोटा आहे तोच सोडला जात नाही. त्यावर आजपर्यंत सरकारचे आणि जलसिंचन खात्याचे लक्ष कसे गेले नाही असा सवाल आता निर्माण झाला आहे, तर दुसरीकडे अगोदरच तिळारी प्रकल्पातून गोव्याला कमी प्रमाणात पाणी सोडले जाते आणि त्यातलाच अर्धा वाटा सध्या हाळी नेतर्डे या ठिकाणच्या कालव्याद्वारे बांदा डोंगरपाल या महाराष्ट्रातील भागाकडे वळविला जात आहे.

पेडणे तालुक्यासाठी तिळाली प्रकल्पातून येणारे पाणी जर व्यवस्थित सोडले, तर जलसिंचन खात्याला नदीवर पंप बसवून नदीचे पाणी वळविण्याची गरज भासणार नाही.

- नारायण सोपटे केरकर,

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com