मागील १३ दिवसांत रुग्णालयात केवळ १९ टक्के रुग्ण दाखल

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 14 ऑक्टोबर 2020

दिवसभरात १ हजार ५७० जणांचे नमुने चाचणीसाठी घेण्यात आले. ४०८ जण आज पॉझिटिव्ह आढळले, तर २२३ जणांना घरगुती उपचारासाठी परवानगी देण्यात आली. ५५४ जणांची प्रकृती सुधारामुळे घरी पाठविण्यात आले. आत्तापर्यंतच्या रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत असून, आज ते ८७.६४ टक्क्यांवर पोहोचले आहे.

पणजी-  राज्यात मागील चोवीस तासांत कोरोनामुळे तिघेजण दगावले आहेत. त्यामुळे आत्तापर्यंत कोरोनाच्या बळींची संख्या ५१४ वर पोहोचली आहे. तर दुसरीकडे या महिन्यात १ ते १३ तारखेपर्यंत ५ हजार २१९ जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यांपैकी १००१ जणांना रुग्णालयात दाखल करून घेण्यात आले. त्यामुळे तेरा दिवसांतील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आणि रुग्णालयात जाणाऱ्यांचे दाखल होण्याचे प्रमाण पाहिले तर १९.१७ टक्के असे राहिले आहे. 

दिवसभरात १ हजार ५७० जणांचे नमुने चाचणीसाठी घेण्यात आले. ४०८ जण आज पॉझिटिव्ह आढळले, तर २२३ जणांना घरगुती उपचारासाठी परवानगी देण्यात आली. ५५४ जणांची प्रकृती सुधारामुळे घरी पाठविण्यात आले. आत्तापर्यंतच्या रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत असून, आज ते ८७.६४ टक्क्यांवर पोहोचले आहे. म्हणजेच ३९ हजार ८२ पॉझिटिव्ह रुग्णांपैकी ३४ हजार २५२ रुग्ण बरे झाल्याचे आकडेवारी सांगते.  मागील चोवीस तासांत जे तिघे मृत झाले आहेत, त्यात फोंडा येथील ४८ वर्षीय पुरुष, काणका येथील ५३ वर्षीय पुरुष, माकाझण येथील ५८ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. त्यातील दोघांचा गोमेकॉत, तर एकाचा मडगावातील ईएसआय रुग्णालयात मृत्यू झाला आहे. 
या महिन्यातील आकडेवारीवर नजर
ता.    पॉझिटिव्ह        दाखल रुग्ण
१      ५२४           ७१
२      ५१३           ८४
३     ४४५            ८१
४      ४२८            ९२
५      ३९१           ६७
६     ५१९           ८९
७      ४३२           ७१
८      ४३२           ८२
९       ४८९            ९९
१०     ३४३            ५७
११      ४३२           ६४
१२      ३०८           ६७
१३      ४०८           ७७.
 

संबंधित बातम्या