गोवा जिल्हा पंचायत निवडणूकीसाठी केवळ ३१ कोरोना रुग्णांकडून मतदान

दैनिक गोमन्तक
रविवार, 13 डिसेंबर 2020

राज्यात कोविडची लागण झालेल्या ३१ जणांनी काल मतदान केलं. राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या माध्यमातून या रुग्णांच्या घरी पीपीई कीट पोहोचवण्याची व्यवस्था करण्यात आली होती.

पणजी :   राज्यात कोविडची लागण झालेल्या ३१ जणांनी काल मतदान केलं. राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या माध्यमातून या रुग्णांच्या घरी पीपीई कीट पोहोचवण्याची व्यवस्था करण्यात आली होती. स्थानिक मतदार अधिकाऱ्यांनी आपल्या कार्यक्षेत्रात कोविडची लागण झालेले रुग्ण किती आहेत आणि त्यापैकी किती जणांची मतदान करण्याची इच्छा आहे याची माहिती संकलित केली होती. सहाशे ते सातशे जण या पद्धतीने मतदान करतील, असे गृहीत धरून बाराशे पीपीई किटची व्यवस्था निवडणूक यंत्रणेने आरोग्य खात्याच्या मदतीने केली होती. मात्र प्रत्यक्षात ३१ जणांनीच मतदान केले.

 

काणकोण तालुक्यातील जिल्हा पंचायतीच्या निवडणुकीत २८ पैकी  ५ कोरोनाग्रस्तांकडून मतदान

 

खोर्जुवे येथे कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अमरनाथ पणजीकर यांनी कुटुंबियांसह पीपीई कीट घालून मतदान केले आणि त्याची छायाचित्रेही सर्वांना उपलब्ध केली. उत्तर गोव्यात १५ कोविड रुग्णांनी मतदान केले. त्यांची मतदारसंघवार संख्या अशी शिवोली- १, कोलवाळ-१, हळदोणे- ६, सुकूर- २, खोर्ली -१, लाटंबार्से -२, मये -१, होंडा- १. दक्षिण गोव्यात १६ जणांनी मतदान केले. मतदारसंघवार त्यांची संख्या अशी उसगाव गांजे- १, बेतकी खांडोळा -२, कवळे -१, वेळ्ळी- १, धारबांदोडा -२, रिवण -२, खोल- १, कुठ्ठाळी- ३ आणि पैंगीण -३.

 

अधिक वाचा :

कोरोनामुळे गोवा जिल्हा पंचायत निवडणूकीच्या मतदानाचा टक्का घटला ; मतमोजणी उद्या

सत्तरीत जिल्हा पंचायतीसाठी मतदानाची मतदानाची टक्केवारी घसरली

संबंधित बातम्या