
जगभरातील महिलांप्रमाणेच राज्यातील महिलांनाही गरिबी,बरोजगारी,महागाई, कामाच्या ठिकाणी होणारी अवहेलना, घरगुती हिंसाचार आदींशी सामना करावाच लागत आहे. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण अहवालातून समोर आलेले सत्यही गंभीर असून राज्यातील लिंग गुणोत्तराचे प्रमाण घटले आहे.
सध्या ते एक हजार पुरूषांमागे 838 इतके झाले असून यावर राज्य सरकारला गांभीर्याने विचार करावा लागेल,असे मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सबिना मार्टिन्स यांनी व्यक्त केले आहे. सर्वच पातळ्यांवर स्त्री-पुरूष समानता हवी,असेही त्या म्हणाल्या.
बायलांचो सादच्या वतीने आयोजित आंतरराष्ट्रीय महिला दिन कार्यक्रमात त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या, 8 मार्च हा आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा केला जातो. परंतु या दिवसाचे महत्त्व समजून घेण्याऐवजी महिला दिन का साजरा करतात, असा प्रश्न लोक विचारतात. शैक्षणिकदृष्ट्या गोवा राज्य समृद्ध असूनही राज्यात लिंग गुणोत्तरात घट होतेय. महिलांवर घरात आणि कामाच्या ठिकाणी लैंगिक अत्याचाराच्या घटना तसेच विधवांना सामाजिक-सांस्कृतिक घटनांमधून बहिष्कृत करण्याच्या घटना घडत आहेत.
विधवांची अवहेलना थांबणार कधी ?
महिलांना मिळत नसलेले सहकार्य आणि पोलिसांच्या निष्काळजीपणामुळे बहुतांश गुन्ह्यांची नोंद होत नाही. गोव्यातील अनेक ग्राम पंचायती विधवांच्या हक्कांसाठी आणि सामाजिक बहिष्कार थांबविण्यासाठी प्रयत्न करत आहेत. परंतु लोक विधवांना पहाटे-पहाटे पाहणे, हे सध्याच्या युगातही दुर्दैवाचे लक्षण मानतात,हेच दुर्दैव नव्हे का, विधवांची अवहेलना थांबणार कधी, असा प्रश्न सबिना मार्टिन्स यांनी उपस्थित केला.
चिंतेची बाब : मार्टिन्स म्हणाल्या, पुरूषांच्या तुलनेत महिलांची संख्या 980 वरून 838पर्यंत घसरली आहे. राज्यातील वाढत्या स्त्री भ्रूण हत्येमुळे असे होऊ शकते, ही एक चिंताजनक बाब आहे. गोव्यातील महिला घरांमध्ये सुरक्षित नाहीत. त्यांना नातेवाईक, मित्र, सहकारी, शेजारी वास्तव्य करणाऱ्यांच्या लैंगिक अत्याचाराला बळी पडावे लागते.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.