आम आदमी पक्षच गोव्‍याचा सर्वांगीण विकास साधू शकतो: 'आप'चे अभिजीत देसाई

प्रकाश भगत आणि संतोष नाईक यांच्या प्रभागांत विकासकामांचा शुभारंभ केल्‍यानंतर देसाई बोलत होते.
AAP

AAP

Dainik Gomantak 

सांगे: आम आदमी पक्षच गोव्‍याचा सर्वांगीण विकास साधू शकतो. केजरीवाल यांनी केलेल्‍या विविध घोषणांमुळे गोमंतकीय जनता प्रभावित झालेली आहे. या घोषणा पूर्ण करण्‍यासाठी पक्ष कटिबद्ध आहे. म्‍हणूनच सांगेच्‍या (Sanguem) कोनाकोऱ्यांतून ‘आप’ला (AAP) वाढत पाठिंबा मिळत आहे, असे प्रतिपादन पक्षाचे सांगे मतदारसंघ प्रमुख तथा नेत्रावळीचे उपसरपंच अभिजीत देसाई (Abhijeet Desai) यांनी केले. ग्रामपंचायत क्षेत्रात 56 लाखांपेक्षा अधिक रुपयांची विकासकामे मार्गी लावली असल्‍याचेही ते म्‍हणाले.

<div class="paragraphs"><p>AAP</p></div>
रुमडामळ पंचायतक्षेत्रात उघड्यावर वाहणाऱ्या सांडपाण्याची समस्या

पंच प्रकाश भगत आणि संतोष नाईक यांच्या प्रभागांत विकासकामांचा शुभारंभ केल्‍यानंतर देसाई बोलत होते. यावेळी ग्रामस्‍थही मोठ्या संख्‍येने उपस्‍थित होते. देसाई म्हणाले, पंच म्हणून निवडणूक (Election) लढविली त्यावेळी जनतेला दिलेली बहुतांश आश्वासने पूर्ण केलेली आहेत. सांगेच्या जनतेने यापुढे लोकप्रतिनिधी म्हणून एक संधी दिल्यास मतदारसंघाचा चेहरामोहरा बदलून टाकू. काही युवक नोकरी मिळेल या आशेने सत्ताधारी पक्षाच्‍या नेत्‍यांसमवेत फिरत आहेत. पण याच सरकारमधील मंत्र्यांनी नोकऱ्यांचा बाजार मांडला आहे, हे ते विसरतात. आम्‍ही त्‍यांना दोष देत नाही. पण एक दिवस सत्‍य समजून चुकल्‍यावर तेच त्‍या नेत्‍यांना जाब विचारतील.

दरम्‍यान, शुभारंभ करण्‍यात आलेल्‍या कामांच्या यादीत रुमडे येथे रस्त्यावर काँक्रीट साकव बांधणे, देवरे येथे अंतर्गत रस्ता बांधणी, खुटये येथे रस्‍त्‍याचे डांबरीकरण, गोविंद गावकर यांच्या घराजवळून कतलामळमार्गे रस्‍ता कामाचा समावेश आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com