काणकोण तालुक्यातील जिल्हा पंचायतीच्या निवडणुकीत २८ पैकी ५ कोरोनाग्रस्तांकडून मतदान

दैनिक गोमन्तक
रविवार, 13 डिसेंबर 2020

काणकोण तालुक्यातील जिल्हा पंचायतीच्या निवडणुकीत वेगवेगळ्या मतदान केंद्रावर २८ कोरोनाग्रस्त मतदार होते.

काणकोण: काणकोण तालुक्यातील जिल्हा पंचायतीच्या निवडणुकीत वेगवेगळ्या मतदान केंद्रावर २८ कोरोनाग्रस्त मतदार होते. त्यापैकी फक्त पाच कोरोना रुग्णांनी मतदानाचा अधिकार बजावला.

त्यामध्ये खोला मतदारसंघातील कुडय मतदान केंद्र व आगोंद मतदान केंद्रावर प्रत्येकी एक, पैंगीण मतदारसंघातील महालवाडा केंद्रावर एक व शेळी केंद्रावर दोन मतदारांनी मतदानाचा अधिकार बजावला‌. कोरोनाग्रस्त मतदारांसाठी निवडणूक आयोगाने संध्याकाळी ४ ते ५ या वेळेत मतदान करण्याची सोय उपलब्ध करून दिली होती. त्यावेळत मतदान केंद्रावरील अधिकाऱ्यांना खबरदारी म्हणून ‘फेस शिल्ड’ वापरण्याची सूचना करण्यात आली होती.

कोरोनाग्रस्त मतदारांनी पीपीई कीट घालून मतदान केंद्रावर येऊन मतदान केले.
मतदान केंद्राबाहेर कोरोना महामारीच्या कारणात्सव सामाजिक दूरी पाळण्यासाठी एक मीटरच्या अंतराने मार्कींग करण्यात आले होते.

संबंधित बातम्या