Goa: केवळ शेतकऱ्यांचे हित जपणार; प्रवीण आर्लेकर

110 शेतकऱ्यांना (Farmers) मोफत शेतीविषयक (Agricultural)अवजारे वितरीत केली.
Goa: केवळ शेतकऱ्यांचे हित जपणार; प्रवीण आर्लेकर
110 शेतकऱ्यांना मोफत शेतीविषयक अवजारे वितरीत करताना मान्यवर Dainik Gomantak

मोरजी: पूर्वी धारगळ या मतदार संघातून तीन वेळा आणि आता पेडणे मतदार संघातून (Constituency) एकदा मिळून चार वेळा निवडून आलेल्या उपमुख्यमंत्री (Deputy Chief Minister) बाबू आजगावकर (Babu Azgavkar)यांनी 20 वर्षाच्या आमदारकीच्या आणि मंत्रिपदाच्या काळात शेतकऱ्यांच्या हितासाठी कोणत्या योजना राबवल्या उलट शेतकऱ्यांच्या जमिनी बेकायदा हिसकावून सरकारच्या घशात घालण्याचे काम केले. शेतकऱ्यांच्या आणि भूमिपुत्रांच्या गेलेल्या जमिनी परत मिळवून देण्यासाठी आणि जमिनीना संरक्षण देण्यासाठी आपण वचनबध असणार त्यासाठी आपल्याला जनसेवा करण्यास आमदार म्हणून विधानसभेत जाण्याची संधी द्यावी असे आवाहन मगोचे नेते प्रवीण आर्लेकर यांनी धारगळ येथे 110 शेतकऱ्यांना शेतीविषयक अवजारे वितरीत केले.

धारगळ पंचायत क्षेत्रातील चीचुले वाडा व दाडाचीवाडा येथील एकूण 110 शेतकऱ्यांना (Farmers )मोफत शेतीविषयक अवजारे वितरीत केली. त्यावेळी माजी आमदार (MLA) परशुराम कोटकर, माजी जिल्हा पंचायत सदस्य तुकाराम हरमलकर, माजी पंच आवेलीन रोद्रीगीस , वकील मुरारी परब, रमाकांत तुळसकर आदी उपस्थित होते.

110 शेतकऱ्यांना मोफत शेतीविषयक अवजारे वितरीत करताना मान्यवर
मोरजी किनाऱ्यावरील कचरा विदेशी पर्यटक करतात गोळा; पाहा व्हिडिओ

मगोचे नेते प्रवीण आर्लेकर (Praveen Arlekar)यांनी बोलताना शेतकऱ्यांना यापुढे जर आपण आमदार झालो तर शेतीसाठी एकही पैसा खर्च करावा लागणार नाही. सर्व सरकारच्या योजना आणि आपण आपल्या खर्चातून योजना शेतकऱ्यांच्या दारापर्यंत पोचवणार आहे. शेतकऱ्यांना योजना मिळवण्यासाठी आपल्या दारावर येण्याची गरज नाही आपण योजना घेवून शेतकऱ्यांच्या दारापर्यंत जाणार अशी ग्वाही दिली.

एकदाच शेवटची संधी द्या: माजी आमदार परशुराम कोटकर

पेडणेचे माजी आमदार परशुराम कोटकर यांनी स्वाभिमानी पेडणेकराना र्हुदयातून हाक मारताना हि कदाचित आपली शेवटची निवडणूक आहे. यापुढे आपोआप लोकांकडे मते मागायला येईल याची शास्वती नसल्याने स्वाभिमानी पेडणेकारनी (Pednekar)परत एकदा मगो पक्षाला मते देवून प्रवीण आर्लेकर याना विजयी करण्याचे आवाहन केले. स्वाभिमानी पेडणेकर याही पुढे ताठ मानेने जगणार आहे ते विरोधकांच्या भूलथापाना बळी पडणार नाही. मगो पक्षाला विजयी करून ते भाऊसाहेब बांदोडकर यांचे स्वप्न पूर्णं करतील असा विश्वास व्यक्त करून आपण कदापही मगो पक्ष सोडून जाणार नसल्याची ग्वाही दिली.

कॉंग्रेसचे (Congress) नेते आणि वकील (advocate)मुरारी परब यांनी बोलताना प्रवीण आर्लेकर यांच्या कार्याला आकर्षित होवून आपण या कार्यक्रमाला आलो आहे. जिथे आपल्या वाड्यावरील जनता ज्याच्या बाजूने राहते त्याच बाजूने आपण राहत आहे. 20 वर्षाच्या मंत्रीपदाच्या (Minister)कारकिर्दीत बाबू आजगावकर यांनी कुणाला किती नोकऱ्या दिले हे विचारण्याची गरज आहे. त्यांनी स्वताचा आणि आपल्या घरमंडळीचा विकास केल्याचा दावा करून आता पेडणे मतदार संघातील आमदार बदलण्याची गरज असल्याचे सांगितले.

110 शेतकऱ्यांना मोफत शेतीविषयक अवजारे वितरीत करताना मान्यवर
मोरजी ते पणजी कदंबा बससेवा सुरु

माजी जिल्हा पंचायत सदस्य तुकाराम हरमलकर (Tukaram Harmalkar)यांनी बोलताना आता पेडणे मतदार संघातून परिवर्तन करताना पुन्हा एकदा मगो पक्षाला विजयी करून उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर याना घरी पाठवण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

धारगळचे माजी पंच आवेलीन रोद्रीगीस यांनी बोलताना सरकार तुमच्या दारी उपक्रम राबवून शेतकऱ्याना मागच्या दारातून हाकलून देण्याचा प्रयत्न केला आहे. 20 वर्षात उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी शेतकऱ्यासाठी काय दिले असा सवाल, बाबू आजगावकर यांनी 20 वर्षे जी सेवा केली ती आता पुरे आता त्यांनी गांधी मार्केट (Gandhi Market)मध्ये जावून सेवा करण्याचे आवाहन श्री रोद्रीगीस यांनी केले.

Related Stories

No stories found.