गोमेकॉतील ओपीडी होणार सुरू

गोमेकॉतील ओपीडी होणार सुरू
OPD in Gomeco will Start

पणजी: बांबोळी येथील ‘गोवा वैद्यकीय महाविद्यालया’तील (Goa Medical College) (गोमेकॉ) कोरोना महामारीमुळे बंद ठेवण्यात आलेले बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) (OPD) आता येत्या ३० जूनपासून टप्याटप्याने खुले केल जाणार आहे. राज्यातील जिल्हा इस्पितळे (District Hospitals) आणि प्राथमिक केंद्रातील ओपीडीही सुरू केल्या जाणार असल्याची माहिती गोमेकॉचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर यांनी दिली.(OPD in Gomeco will Start )

सध्या फक्त अस्थिरोग विभागाची ओपीडी सुरू करण्यात आली आहे. मात्र, येत्या ३० जूनपासून सर्व विभागाच्या ओपीडी टप्याटप्याने खुले होणार आहे. 

दरम्यान, वाढत्या कोरोना प्रसारामुळे सर्व सुट्या रद्द करण्यात आलेल्या डॉक्टरांवर सतत ड्युटीवर हजर राहण्याचा आदेश आरोग्य खात्याने दिला होता. कोरोनाचे संसर्ग सध्या कमी झाला असल्याने सरकारी डॉक्टरांना आता फिरत्या पद्धतीने सुट्या देण्यात येणार आहे.

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com