'त्या' समारंभाला निर्माण करण्यात आलेल्या अडचणीचा गावकरांनी वाचला पाढा

प्रसाद गावकर : विरोधकांचे आरोप बिनबुडाचे आणि तथ्‍यहीन
MLA of Sanguem Prasad Gaonkar
MLA of Sanguem Prasad GaonkarDainik Gomantak

सांगे: निवडणुकीच्‍या काळात आपण दिलेली आश्‍‍वासने पूर्ण केलेली आहेत. विशेष म्‍हणजे प्रतिकूल परिस्‍थितीत हे आव्‍हान पेलले आहे. कोविड महामारी असूनही गेल्‍या पाच वर्षांत सांगे मतदारसंघात तब्‍बल 500 कोटींची विकासकामे केली, अशी माहिती सांगेचे माजी आमदार प्रसाद गावकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. सांगे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पायाभरणी समारंभाला कशा प्रकारे अडचणी निर्माण करण्यात आल्या याचा पाढाच त्‍यांनी वाचला. यावेळी सांगे काँग्रेस गटाचे कार्यकर्ते उपस्थित होते.(Opponents allegations baseless and unfounded Statement of Prasad Gaonkar)

MLA of Sanguem Prasad Gaonkar
मला रोखण्यासाठीच मगोची युती : मामलेदार

17 कोटी रुपये खर्चून सांगे प्राथमिक आरोग्य केंद्र उभारणीसाठी कामाला सुरुवात झाली आहे. त्याची पायाभरणी करण्यासाठी आपण सरकारला विनंती केली, पण निवडणूक आचारसंहिता लागू होईपर्यंत तारीख देण्यात आली नाही. याचे कारण विचारले असता, ते म्हणाले आपले नाव पाटीवर येईल म्हणून असेल कदाचित. आपण आपल्या निवडणूक काळात जनतेला 100 बेडचे हॉस्पिटल उभारण्‍याचाशब्द दिला होता. ते जरी शक्य झाले नसले तरी किमान 30 खाटांचे हॉस्पिटल उभारले जात आहे. तेथे आवश्यक त्‍या सर्व सुविधा पुरविण्यात येतील. केलेल्या कामाची आपण कधी जाहिरात केली नाही, असे गावकर (Prasad Gaonkar) म्‍हणाले.

MLA of Sanguem Prasad Gaonkar
Goa Covid Updates: गोव्यात कोरोनाची तिसरी लाट

रुग्‍णवाहिकेचा विषय मार्गी लावताना आरोग्यमंत्र्यांना विनंती करून खास कार्डियाक कक्ष सुरू केला. तसेच रुग्‍णवाहिका आणली. विरोधक आपण निष्क्रिय असल्याचा जो आरोप करीत आहे त्याचा समाचार घेताना गवकर म्‍हणाले की, चष्‍मा लावून संपूर्ण मतदारसंघात फेरफटका मारा, मगच प्रसाद गावकर निष्क्रिय की सक्रिय ते ठरवा. आगामी निवडणुकीत सांगेतील जनता ठरविणार कोण निष्क्रिय ते. आपण आमदारकीचा राजीनामा देऊन काँग्रेस पक्षात रीतसर प्रवेश केलाय. आता विखुरलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांना एकत्र करून विजय प्राप्त करण्यासाठी मेहनत करणार आहे, असेही ते म्‍हणाले.

सांगेतील (Sanguem) काँग्रेस कार्यकर्ते एकसंध!

काँग्रेस (Congress) गट अध्यक्ष जितेंद्र नाईक म्हणाले की, अजून सांगेची उमेदवारी नक्की झाली नसली तरी माजी आमदार प्रसाद गावकर यांचे पारडे जड आहे. पक्ष ज्याला उमेदवारी देईल त्याला विजयी करण्यासाठी आम्‍ही कटिबद्ध आहोत. तर, नगरसेवक रुमाल्डो फर्नांडीस म्हणाले की, प्रसाद गावकर यांनी केलेला विकास सांगेवासीयांच्या नजरेसमोर आहे. त्‍यांच्या कालावधीत गुंडगिरी फोफावली नाही. यापूर्वी सांगेवासीयांनी ती अनुभवली होती. नगरसेविका फौजिया शेख म्हणाल्या, मुख्यमंत्री कुडचडेत येऊन बारीकसारीक कामाचे उद्‌घाटन करतात पण त्यापुढे सात किलोमीटर अंतरावर असलेल्या सांगे मतदारसंघात येण्यासाठी त्‍यांना सवड मिळत नाही. यावेळी रजनीकांत नाईक यांनीही विचार व्यक्त करताना कोणत्याही परिस्थितीत काँग्रेस पक्ष विजय प्राप्त करणार असल्याचे ठासून सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com