Goa Governor: कोंकणी नवलेखकांना संधी! राजभवन साहित्यिकांना करणार 'ही' मदत...

राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी दिली माहिती
Goa Governor | Sreedharan Pillai
Goa Governor | Sreedharan PillaiDainik Gomantak

Goa Governor: गोव्याची राज्यभाषा असलेल्या कोंकणी भाषेत लिहिणाऱ्या साहित्यिकांना आता राजभवन प्रोत्साहन देणार आहे. त्यासाठी कोंकणी भाषेत लिहिणाऱ्या नवलेखकांना मदत केली जाणार आहे. राज्यपाल पी. एस. श्रीधरन यांनी ही माहिती दिली.

Goa Governor | Sreedharan Pillai
Porvorim News: धक्कादायक! गोव्यात झळकला 'गोवन्स आर नॉट वेलकम' असा बोर्ड...

राज्यपाल श्रीधरन म्हणाले की, राजभवन कोंकणी भाषेत लिहिणाऱ्या २५ नव लेखकांना प्रोत्साहन देणार आहे. त्यांची पुस्तके प्रकाशित केली जातील. ज्या नवलेखकांनी अद्याप त्यांचे पुस्तक प्रकाशित केलेले नाही, अशा साहित्यिकांनी पुढे येऊन आपले प्रपोजल राजभवनकडे द्यावे.

कोंकणी भाषेतील तज्ज्ञांकडून हा अर्जांची छाननी केली जाईल. त्यानंतर पुस्तक प्रकाशनाबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. राजभवनतर्फे लवकरच याबाबत घोषणा करण्यात येणार आहे.

Goa Governor | Sreedharan Pillai
Mauvin Godinho: गोव्यात विमानतळावर बहुमजली पार्किंग, एअरपोर्ट ते वेर्णा फ्लायओव्हर आणि मॉडर्न बसस्थानके...

दरम्यान, गतवर्षी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोव्यात उच्च न्यायालयाच्या कामकाजात इंग्रजीसोबत कोकणीचा वापर व्हावा, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले होते. गोव्यातील जनतेवर चार भाषांचा प्रभाव असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटले होते.

आम्ही बोलतो कोकणी, वर्तमानपत्रं मराठीतील वाचतो, चित्रपट हिंदी बघतो आणि लिहितो इंग्रजीत असे सांगत आता राजभाषा कोकणीला सरकारदफ्तरी न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरु केल्याचे त्यांनी म्हटले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com