गोमंतकीय कलाकारांना ‘सूर नवा ध्यास नवा’ कार्यक्रमात संधी

Opportunity for Gomantakiya young singers in the program Sur Nava Dhyas Nawa
Opportunity for Gomantakiya young singers in the program Sur Nava Dhyas Nawa

फातोर्डा:  कलर्स मराठी(Colors Marathi) टिव्हीचा संगीतकार, निर्माता, दिग्दर्शक, गायक अवधुत(Avadhoot Gupte) गुप्तेनिर्मित ‘सूर नवा ध्यास नवा’ (Sur Nava Dhyas Nawa) या महिलांसाठीच्या पर्वाच्या भागांचे चित्रिकरण मडगाव येथील रवीन्द्र भवनात झाले. येथे चित्रीत केलेल्या सहा भागांचे  गेल्या दोन आठवडयात प्रसारीत झाले. पहिल्याच भागाची सुरुवात मडगावचे दैवत श्री दामबाब यांच्यावर माजी आमदार, कवी दामोदर नाईक यांनी लिहिलेल्या "देवा दामोदरा पाव रे, सगळ्यांक तू पाव" या कोंकणी स्तवनाने झाले. एरव्ही या गीताचे मूळ संगीतकार अशोक पत्की आहेत. येथे हे गाणे गाण्यासाठी गोव्याचे युवा गायक अनिकेत दड्डीकर, शुभम नाईक, आकाश तेलगू, निकिता प्रभू व रेशा वेर्णेकर यांची निवड करण्यात आली होती. गायक स्पर्धकांना कोरस देण्यासाठी प्रणाली म्हाळशी, करिष्मा च्यारी व श्रृद्धा जोशी यांची निवड करण्यात आली होती.(Opportunity for Gomantakiya young singers in the program Sur Nava Dhyas Nawa)

या स्पर्धेत ज्या सोळा महिलांची निवड झाली, त्यात गोव्याच्या हेत्वी सेठिया विश्र्वा हिचा समावेश आहे. या  कार्यक्रमात सहभागी झालेल्या गोमंतकीय गायकांनी या पेक्षा चांगली संधी देऊ, असे  संगीतकार व गायक अवधुत गुप्ते यांनी या प्रसंगी सांगितले. दामोदर नाईक यांनी छोट्याशा वार्तालापात गोमंतकीय कलाकारांना संधी द्यावी, असे आवाहन कार्यक्रमाच्या निर्मात्यांना केले. गोमंतकीय कलाकार आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजले आहेत व गाजत आहेत. गोव्याने कित्येक रत्ने देशाला व जगाला दिली असेही नाईक यांनी  सांगितले. 'गोवा ही कलाकारांची पवित्र भूमी असल्याचे व गोमंतकाने अनेक जगप्रख्यात गायक, संगीतकार, नाटककार दिले, असे अवधुत गुप्ते यांनी सांगितले. माझे गुरु पंडित जितेंद्र अभिषेकी हे गोव्याचे, त्यामुळे मला गोव्याचा फार अभिमान वाटतो, असे मत महेश काळे यांनी व्यक्त केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com