म्हार्दोळ सभागृहात कोरोना केंद्रास विरोध

Narendra tari
गुरुवार, 30 जुलै 2020

म्हार्दोळ येथील पंचायतीच्या सभागृहात कोरोना रुग्णांची व्यवस्था करण्यास वेलिंग प्रियोळ कुंकळ्ये पंचायतीच्या पाच पंचसदस्यांनी तीव्र विरोध केला आहे. म्हार्दोळ येथे आज (बुधवारी) यासंबंधीच्या पत्रकार परिषदेत पाचही पंचांनी आपला विरोध दर्शवला. यावेळी लक्ष्मीकांत खेडेकर, मंगेश गावडे, रोहिणी नाईक, हर्षा गावडे व संजना गावडे हे पाचही पंच व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.

मडकई

म्हार्दोळ येथील पंचायतीच्या सभागृहात कोरोना रुग्णांची व्यवस्था करण्यास वेलिंग प्रियोळ कुंकळ्ये पंचायतीच्या पाच पंचसदस्यांनी तीव्र विरोध केला आहे. म्हार्दोळ येथे आज (बुधवारी) यासंबंधीच्या पत्रकार परिषदेत पाचही पंचांनी आपला विरोध दर्शवला. यावेळी लक्ष्मीकांत खेडेकर, मंगेश गावडे, रोहिणी नाईक, हर्षा गावडे व संजना गावडे हे पाचही पंच व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.
वेलिंग प्रियोळ कुंकळ्ये पंचायतीच्या निर्णयाच्या विरोधात आम्ही नाही, मात्र म्हार्दोळ बाजार आणि लोकवस्तीच्या ठिकाणी पंचायतीच्या सभागृहात अशी व्यवस्था करू नये, ते इतरांसाठी धोकादायक ठरू शकते, असे लक्ष्मीकांत खेडेकर यांनी सांगितले. प्रियोळ पंचायतीत कोरोना रुग्ण वाढल्यानंतर सरपंचानी आकस्मिक बैठक बोलावली, त्या बैठकीला आम्ही उपस्थित होतो. त्यात पंचायतीच्या सभागृहात कोरोना रुग्णांची व्यवस्था करण्यासंबंधी चर्चा झाली होती, मात्र निर्णय झाला नव्हता. तरीपण या सभागृहात ज्या ठिकाणी बाजार भाग आहे,, अशा ठिकाणी कोरोना रुग्णांना ठेवणे हे इतरांसाठी धोकादायक असून फर्मागुढीला कोरोना रुग्णांसाठी आवश्‍यक केंद्रांची उभारणी केली असताना आणखी म्हार्दोळात वेगळी व्यवस्था करण्याचे कारण काय, असा सवाल खेडेकर यांनी केला आहे.
समीर नाईक यांनी म्हार्दोळ बाजारातील सभागृहात अशाप्रकारची व्यवस्था करणे गैर आहे. वास्तविक पंचायतीने निर्णय योग्य घेतला, पण ही जागा नव्हे. वास्तविक कोरोना रुग्णांसाठी आवश्‍यक सुविधा उपलब्ध करणे गरजेचे आहे, पण या सभागृहात कोणतीच सुविधा नाही, त्यामुळे बाजार भागात अशी व्यवस्था करू नये, असे सांगितले.
उमेश गावडे यांनी आम्ही भरवस्तीत कोरोना केंद्र सुरू करण्यास आमचा पूर्वीपासून विरोध आहे. या भागाचे आमदार तसेच मंत्री गोविंद गावडे यांनाही याबाबत कळवलेले नाही. म्हार्दोळच्या या बाजारात आधीच गैरसोयी आहेत, अस्वच्छता आहे, त्यामुळे कोरोना रुग्णांना अशा स्थितीत ठेवणेही धोकादायक असल्याचे गावडे म्हणाले. दरम्यान, वेलिंग प्रियोळ कुंकळ्ये पंचायतीचे सरपंच पांडुरंग गावडे यांनी पक्ष कोणताही असला तरी आतापर्यंतच्या विधायक निर्णयाला सर्वांचे सहकार्य लाभले आहे. मात्र कोरोनासंबंधी आधी संमती दिली, आणि आता विरोध म्हणजे त्यात काय राजकारण आहे, हे आम्हाला तरी माहीत नाही, अशी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले.

Edit - sanjay ghugretkar

संबंधित बातम्या