गोव्याचा विकास विरोधकांना पाहवत नाही

गोमंतक वृत्तसेवा
शनिवार, 31 ऑक्टोबर 2020

राज्य सरकारने महामारीचा भार असतानाही विकासाच्या बाबतीत कोणतीच तडजोड केलेली नसून सरकारच्या चौफेर विकासाची धस्ती विरोधकांनी घेतली असून राजकीय लाभासाठी विरोधी पक्ष व युरोपात स्थायिक झालेले काही लोक सरकारच्या विकासात आडकाठी आणतात असा आरोप मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी कुंकळ्ळी येथे बोलताना केला.

कुंकळ्ळी: राज्य सरकारने महामारीचा भार असतानाही विकासाच्या बाबतीत कोणतीच तडजोड केलेली नसून सरकारच्या चौफेर विकासाची धस्ती विरोधकांनी घेतली असून राजकीय लाभासाठी विरोधी पक्ष व युरोपात स्थायिक झालेले काही लोक सरकारच्या विकासात आडकाठी आणतात असा आरोप मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी कुंकळ्ळी येथे बोलताना केला.

जलस्रोत खाते व ग्रामीण विकास खात्याने भारत सरकारच्या आत्मनिर्भर भारत व राज्य सरकारच्या स्वयंपूर्ण गोवा या योजने अंतर्गत साळावली कालव्याची स्वच्छता व गाळ काढण्याच्या कामाचा शुभारंभ करण्याच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर, जल स्त्रोत मंत्री फिलीप नेरी रोड्रीगीश, आमदार क्लाफास डायस, उपनगराध्यक्ष सुकोरिना कुटीन्हो, अधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्र्यानी यावेळी बोलताना सरकारी विकास प्रकल्पाना विरोध करणा-या राजकीय पक्षावर कडाडून टीका केली.राज्याचा सर्वांगीण विकास विरोधकांना पाहवत नसून नाहक लोकांना भडकावून आपली राजकीय रोटी भाजण्याच्या काम विरोधक करीत आहेत.राज्यातील अंत्योदय योजने अंतर्गत अती गरीब व शेवटच्या व्यक्ती पर्यत विकास पोहचविणे हे आपल्या सरकारचे ध्येय असून आपण कोणत्याही दबावाला बळी न पडता विकास साधण्यात समर्थ असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

लोह मार्ग दुपदरीकरणाच्या कामाला विरोध करणारे राज्यात कोळसा हब होणार अशी भीती जनतेच्या मनात भरवीत आहेत.लोह मार्ग दुपदरीकरण कोळशाच्या वाहतुकीसाठी नव्हे तर नागरिकांच्या हितासाठी करीत असल्याचे मुख्यमंत्र्यानी स्पष्ट केले.राष्टीय महामार्ग, वीज प्रकल्प व इतर प्रकल्पाना होणारा विरोध हा केवळ विरोधासाठी विरोध असून सरकार सर्व विषयावर चर्चा करण्यास तयार आहे.

ग्रामीण भागाच्या विकासासाठी सरकारने खास सरकारी अधिका-याची नेमणूक केली असून हे अधिकारी प्रत्येक शनिवारी प्रत्येक पंचायतीला भेट देऊन सरकारी योजनाची माहिती देणार आहेत.सरकारने अपंगाना योग्य साधन सुविधा व गरजेच्या वस्तू त्याच्या पर्यत पोहचविण्याचे काम हाती घेतले असून प्रत्येक गावाला भेट देऊन सरकारी अधिकारी अपंग व्यक्तीना ज्या साधनांची गरज आहे ते पुरविण्याचे काम हाती घेणार आहेत.केंद्र सरकारच्या योजने अंतर्गत या महामारीच्या काळात स्थानिक कामगारांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या उद्धेशाने साळावली कालव्याची साफ सफाई व काळ काढण्याचे काम स्थानिक मनरेगा कामगारांना देण्याची योजना अंमलात आणली आहे.या योजने अंतर्गत उत्तर गोव्यात सव्वा कोटी खर्चून मनरेगा कामगारांना रोजगार उपलब्ध करून दिला तर दक्षिण गोव्यात साठ किलो मीटर लांबीच्या साळावली कालव्याची दुरुस्ती मनरेंगा कामगारा कडून केली जाणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर याबी यावेळी बोलताना भाजपा सरकारच्या विकासकामांचा आढावा घेतला.राज्यात सद्या भाजपा सरकार व भाजपाचे कार्यकर्तेच सक्रियपणे सामाजिक कार्य हाती घेताना दिसतात झोपलेले विरोधक केवळ विरोध करण्यासाठीच रस्त्यावर येतात असा आरोप कवळेकर यांनी यावेळी बोलताना केला.

राज्यात ,देशात व संपूर्ण जगात सद्या महामारीचा काळ असतानाही राज्य सरकारने शेतकरी, कामगार व गरिबांसाठी जे कार्य केले आहे ते फार मोठे असून सरकार कृषी क्षेत्रात नवीन क्राती घडविण्याच्या प्रयत्नात असल्याचे कवळेकर यांनी सांगितले.

मंत्री फिलिप नेरी रोड्रीगीश यांनी आपल्या खात्यातर्फे हाती घेण्यात येत असलेल्या विविध विकासकामांची यादी सादर केली.मनरेगा कामगारांना काम देण्यासाठी सरकारने दोन कोटी खर्च केले आहेत.कालव्याचे काम आधी कंत्रातदारा मार्फत केले जात होते आता शेतकरी व कामगारच हे काम करणार असून हाताना रोजगार व शेतीला पाणी हे दोनी फायदे स्थानिकांना होणार आहेत. राज्य मार्गाला लागून असलेल्या परोडा कालव्याची दुरुस्ती व इतर अपूर्ण असलेली कामे हाती घेण्यात येणार असल्याचे मंत्री फिलीप नेरी यांनी सांगितले.आमदार क्लाफास डायस यांनीही यावेळी आपले विचार मांडले.

संबंधित बातम्या