गोव्याच्या विरोधी पक्षांकडून 'भारत बंद'ला समर्थन ; पणजीतील आझाद मैदानावर सरकारविरोधात शक्तीप्रदर्शन

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 8 डिसेंबर 2020

दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी आजच्या देशव्यापी बंदला पाठिंबा देण्यासाठी विरोधी पक्षांनी पणजाच्या आझाद मैदानावर सरकारविरोधात शक्तीप्रदर्शन केलं.

पणजी :  येत्या शनिवारी होणारी जिल्हा पंचायत निवडणूक, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा १९ रोजीचा प्रस्तावित राज्य दौरा यामुळे विरोधक आक्रमक झाले आहेत.  दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी आजच्या देशव्यापी बंदला पाठिंबा देण्यासाठी विरोधी पक्षांनी पणजाच्या आझाद मैदानावर सरकारविरोधात शक्तीप्रदर्शन केलं. यावेळी काँग्रेस, गोवा फॉरवर्ड पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस या विरोधी पक्षांचे नेते उपस्थित होते. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मात्र राज्यात बंदचा प्रभाव जाणवणार नाही, असा विश्वास व्यक्त केला आहे.

 

शेतकरी (अधिकार व संरक्षण) करार, किंमत हमी व शेती सेवा कायदा २०२०, शेतकरी शेतमाल व्यापार विक्री (उत्तेजन व सुविधा) कायदा २०२० आणि अत्यावश्यक वस्तू (दुरुस्ती) कायदा २०२० हे तिन्ही कायदे रद्द करावेत, यासाठी शेतकरी आंदोलन करत असून आज देशव्यापी बंदची हाक दिली आहे. दिल्लीत भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार आहे तर राज्यात भाजपचे सरकार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे हे आंदोलन म्हणजे भाजपच्या धोरणांविरोधात आंदोलन असे मानून सर्व विरोधक सरकारविरोधात एकवटले आहेत. त्यांनी या शेतकऱ्यांच्या बंदला पाठिंबा दिला आहे. या बंदचा प्रभाव जाणवू नये, यासाठी सरकार प्रयत्न करत असून बंदचा प्रभाव जाणवावा यासाठी विरोधी पक्षांचे प्रयत्नशील आहेत.

 

संबंधित बातम्या