गोव्यात संचारबंदी होताच विरोधक आक्रमक; संपूर्ण लॉकडाऊनची केली मागणी

दैनिक गोमंतक
शुक्रवार, 7 मे 2021

मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांना लॉकडाऊन शब्दाची अॅलर्जी आहे का अशी विचारणा गोवा फॉरवर्ड या पक्षाचे उपाध्यक्ष दुर्गादास कामत यांनी केली आहे.

गोव्याचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत (Dr.Pramod Sawant) यांनी रविवारपासून संचार बंदीची घोषणा केल्याच्या काही मिनिटातच विरोधीपक्षनेते दिगंबर कामत (Digambar Kamat) यांनी सरकारवर पलटवार केला आहे. सरकारकडून मोठ्या निर्णयाची अपेक्षा होती मात्र सरकारने केवळ संचारबंदी ची घोषणा केली आहे असे त्यांनी ट्विटरवर (Twitter) म्हटले आहे. लोक डाऊन म्हणजे लोक संपत असतानाही सरकार लॉकडाऊन (Lockdown) करत नाही असे त्यांनी म्हटले आहे. कोविड व्यवस्थापनावरील श्‍वेतपत्रिका कुठे आहे अशी विचारणा त्यांनी केली आहे. (Opposition groups called for a complete lockdown)

गोव्यात राज्यस्तरीय कर्फ्यूची घोषणा

मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांना लॉकडाऊन शब्दाची अॅलर्जी आहे का अशी विचारणा गोवा फॉरवर्ड या पक्षाचे उपाध्यक्ष दुर्गादास कामत यांनी केली आहे. त्यांनी एक व्हिडिओ जारी करत त्या व्हिडिओमध्ये मुख्यमंत्री आपल्या एका सहकार्‍याला आपण पूर्ण लॉकडाऊन म्हटले नाही असे सांगताना दिसत असल्याचे जाहीर केले आहे. गोव्यातील सर्वच विरोधी पक्ष कोविड प्रसार रोखण्यासाठी लॉकडाऊनची मागणी करत होते.

येत्या 10 मे पासून गोव्यात येणाऱ्यांना कोविड निगेटिव्ह प्रमाणपत्र सक्तीचे: गोवा...

गोव्यात रविवारी सकाळी सात वाजल्यापासून पंधरा दिवसांची राज्यस्तरीय संचारबंदी सरकारने लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी आज सायंकाळी या निर्णयाची घोषणा केली. या संचारबंदी कालावधी मध्ये किराणा दुकाने सकाळी सात ते दुपारी एक आणि एक नवे सर्विस देणारी किचन सकाळी सात ते सायंकाळी सात या वेळेतच खुली राहतील. फार्मसीना या बंदीतून वगळण्यात आले आहे. या संचार बंदीचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलिस कायदेशीर कारवाई करतील असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. कामाशिवाय लोकांनी घराबाहेर पडू नये असे त्यांनी स्पष्ट केले. 

या पंधरा दिवसातील लग्न, निकाह, ख्रिस्ती विवाह, वाढदिवसाच्या पार्ट्या मुंज किंवा अन्य कौटुंबिक समारंभ हे रद्द केले जावेत त्यासाठी सरकार कोणतीही परवानगी देणार नाही असे मुख्यमंत्र्यांनी आज सांगितले. रविवारपासून जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणारे मालवाहतूकदार सोडून इतरांना राज्यात प्रवेश करण्यासाठी कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण केल्याचे प्रमाणपत्र किंवा कोरोनाची लागण झालेली नाही असे वैध प्रमाणपत्र सोबत आणावे लागणार आहे. याविषयीचे तपशीलवार आदेश जिल्हाधिकारी यांच्या पातळीवर उद्या दुपारी चार वाजेपर्यंत जारी केले जातील असे मुख्यमंत्र्यांनी या विषयी अधिक माहिती विचारल्यावर सांगितले.

संबंधित बातम्या