विरोधी पक्षांनी केली 'पूर्णवेळ अर्थसंकल्पीय अधिवेशनाची मागणी'

गोमंतक वृत्तसेवा
मंगळवार, 16 फेब्रुवारी 2021

अर्थसंकल्पीय अधिवेशन किमान पंधरा दिवसांचे असावे अशी विरोधी पक्षांची मागणी आहे.

पणजी : गोव्याचा अर्थसंकल्प नेमका कधी याचे उत्तर उद्या बुधवारी मिळणार आहे. राज्य मंत्रिमंडळाची उद्या बैठक होणार यांनी त्या बैठकीत विधानसभा अधिवेशन बोलण्यावबाबत निर्णय घेतला जाणार आहे. गोव्यातील विरोधी पक्षांनी पूर्णवेळ अर्थसंकल्पीय अधिवेशन घेतले जावे अशी मागणी केलेली आहे. गेली काही वर्षे सरकार अर्थसंकल्पीय अधिवेशनात लेखानुदान घेते आणि पावसाळी अधिवेशन अर्थसंकल्प मांडून त्यावर मतदान घेते.

गोव्यात आजपासून घरगुती सिलिंडर 50 रुपयांनी महागणार

विरोधकांनी आता मागणी केली आहे की अर्थसंकल्पीय अधिवेशनातच अर्थसंकल्पावर चर्चा करून मतदान घेतले जावे.लेखानुदान सरकारने घेऊ नये. अर्थसंकल्पीय अधिवेशन किमान पंधरा दिवसांचे असावे अशी विरोधी पक्षांची मागणी आहे. सरकार नेमके किती दिवसांचे अधिवेशन घेतो त्याचे उत्तर उद्या मिळणार आहे. मार्च च्या तिसऱ्या आठवड्यात आपण अर्थसंकल्प सादर करू आणि त्या अर्थसंकल्पात स्वयंपूर्ण गोवा या संकल्पनेवर भर असेल असे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी यापूर्वीच जाहीर केले आहे.

संबंधित बातम्या