"गोव्यातील नगरपालिका निवडणूकांचे आरक्षण व तारीख जाहीर करा अन्यथा... "

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 15 मार्च 2021

भाजप सरकारातील सुपर पॉवरच्या दबावाला बळी न पडता, राज्य निवडणूक आयोग व नगरपालीका संचालकांनी पाच नगरपालिका निवडणूकांचे आरक्षण व तारीख जाहीर करावी.

पणजी: भाजप सरकारातील सुपर पॉवरच्या दबावाला बळी न पडता, राज्य निवडणूक आयोग व नगरपालीका संचालकांनी पाच नगरपालिका निवडणूकांचे आरक्षण व तारीख जाहीर करावी. आता परत काही गडबड झाल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत यांनी दिला आहे. 
गोव्यातील भाजप सरकारने विरोधकांचा सल्ला डावलुन आपल्या काही खास उमेदवारांच्या फायद्यासाठी  नगरपालिका प्रभागांचे आरक्षण केले. बहुजन समाज, ओबीसी, मागास वर्गीय व अनुसूचित जमाती तसेच महिलांवर अन्याय करुन हवे तसे प्रभाग आरक्षण केले. परंतु, सर्वोच्च न्यायालयाने सरकारचे कान पिळले व आपल्या कुकर्मांवर सरकार तोंडघशी पडले असे कामत यांनी म्हटले आहे. 
सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निवाड्यात राज्य निवडणूक आयक्तांच्या स्वायत्ततेबद्दल स्पष्ट निर्देश दिले आहेत. कुठल्याही दबावाला बळी न पडता त्यांनी काम करणे गरजेचे आहे. नगरपालिका संचालयानेही प्रभाग आरक्षण करताना योग्य निकषांच्या आधारेच ते करणे गरजेचे आहे असे कामत यांनी सांगितले. 
सरकारी अधिकाऱ्यांनी जबाबदारीने आपले कर्तव्य पार पाडावे. जर आता परत काही घोळ झाल्यास सरकारी अधिकाऱ्यांना ते महागात पडेल असा इशारा  कामत यांनी दिला आहे.

हरमल समुद्रकिनाऱ्यावर वीस हजार रुपयाचे अंमली पदार्थ जप्त 

संबंधित बातम्या