"मला आता कशातच रस राहिलेला नाही"

दैनिक गोमन्तक
मंगळवार, 22 डिसेंबर 2020

मला आता कशातच रस राहिलेला नाही असे उद््गार विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी आज दोनापावल येथे काढले.

पणजी: मला आता कशातच रस राहिलेला नाही असे उद््गार विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी आज दोनापावल येथे काढले. दोनापावल येथील गोवा इंटरनॅशनल सेंटरमध्ये काँग्रेसचे राज्य प्रभारी दिनेश गुंडूराव यांनी नेत्यांना भेटणे सुरु केले आहे. प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांच्या राजीनाम्यानंतर निर्माण झालेल्या पेचावर मार्ग काढण्यासाठी त विचारविनिमय करत आहेत. त्यांची भेट घेऊन परतताना कामत यांना विचारले असता त्यांनी वरील प्रमाणे विधान केले.

बैठकीत नेमके काय झाले अशी विचारणा कामत यांना केली असता ते म्हणाले दिनेश गुंडूराव यांनी सर्वांना भेटणे सुरू केले आहे. कामत हे कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष पदासाठी इच्छुक आहेत का अशी विचारणा केली असता मी उद्या असेल की नाही याची शाश्वती नाही (कॉंग्रेसमध्ये की विरोधी पक्षनेते पदावर हे त्यांनी स्पष्ट केले नाही) असे ते म्हणाले. ते म्हणाले त्याचे निर्णय वर होतात. मला आता कशातच रस राहिलेला नाही. 

आणखी वाचा:

गोव्यातील कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर.. महिना संपायच्या आधीच मिळणार पगार -

संबंधित बातम्या