मागील अर्थसंकल्पातील किती घोषणांची पूर्ती किती झाली ? कामतांचा सवाल

गोमंतक वृत्तसेवा
मंगळवार, 23 मार्च 2021

मागील वर्षाचा अर्थसंकल्प विरोधकांना न जुमानता भाजप सरकारने काही मिनिटांतच संमत करुन घेतला होता.

मडगाव : विधानसभा अधिवेशनात अर्थसंकल्प सादर करण्यापुर्वी  मागील वर्षाच्या अर्थसंकल्पातील किती योजना मार्गी लागल्या ते मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी जाहीर करावे अशी मागणी विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी केली आहे. 

मागील वर्षाचा अर्थसंकल्प विरोधकांना न जुमानता भाजप सरकारने काही मिनिटांतच संमत करुन घेतला होता. अशा या सुपरफास्ट अर्थसंकल्पातील योजनाही जलद गतीने मार्गी लागल्या का याचे स्पष्टीकरण मुख्यमंत्र्यानी देणे गरजेचे आहे, असे कामत म्हणाले. (Opposition leader Digambar Kamats question on previous budget announcements)

गोव्यात येणाऱ्या पर्यटकांना कोविड-19 चाचणीचे नकारात्मक प्रमाणपत्रे द्यावे...

अर्थसंकल्प सादर करण्याआधी राज्याची आर्थिक स्थिती काय आहे याची माहिती लोकांना देणे हे सरकारचे कर्तव्य आहे. सरकार अर्थव्यवस्थेवर श्वेतपत्रीका जारी करण्यास का घाबरते असा सवालही कामत यांनी केला आहे. 

संबंधित बातम्या