गोव्यातील विरोधी पक्षांचा आजच्या 'भारत बंद'ला पाठिंबा ; सरकारविरोधात शक्तीप्रदर्शन करणार

Opposition parties in Goa support todays Bharat Bandh Will demonstrate against the government
Opposition parties in Goa support todays Bharat Bandh Will demonstrate against the government

पणजी :  येत्या शनिवारी होणारी जिल्हा पंचायत निवडणूक, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा १९ रोजीचा प्रस्तावित राज्य दौरा यामुळे विरोधक आक्रमक झाले आहेत. जिल्हा पंचायत निवडणुकीपूर्वी सरकारविरोधात शक्तीप्रदर्शन करण्याचा निर्णय विरोधी पक्षांनी घेतला असून दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी आजच्या देशव्यापी बंदला राज्यातील विरोधी पक्षांनी पाठिंबा दिला आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मात्र राज्यात बंदचा प्रभाव जाणवणार नाही, असा विश्वास व्यक्त केला आहे.

शेतकरी (अधिकार व संरक्षण) करार, किंमत हमी व शेती सेवा कायदा २०२०, शेतकरी शेतमाल व्यापार विक्री (उत्तेजन व सुविधा) कायदा २०२० आणि अत्यावश्यक वस्तू (दुरुस्ती) कायदा २०२० हे तिन्ही कायदे रद्द करावेत, यासाठी शेतकरी आंदोलन करत असून त्यांनी उद्या देशव्यापी बंदची हाक दिली आहे. दिल्लीत भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार आहे तर राज्यात भाजपचे सरकार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे हे आंदोलन म्हणजे भाजपच्या धोरणांविरोधात आंदोलन असे मानून सर्व विरोधक सरकारविरोधात एकवटले आहेत. त्यांनी या शेतकऱ्यांच्या बंदला पाठिंबा दिला आहे. या बंदचा प्रभाव जाणवू नये, यासाठी सरकार प्रयत्न करत असून बंदचा प्रभाव जाणवावा यासाठी उद्या विरोधी पक्षांचे प्रयत्न असतील.


जिल्हा पंचायत निवडणूक शनिवारी (ता.१२) आहे. आठ महिन्यांपूर्वी केलेल्या प्रचाराच्या आधारे उमेदवार या मतदानास सामोरे जाणार आहेत. सध्या राज्यात अनेक प्रकल्पांविरोधात जन आंदोलने सुरू आहेत. यामुळे सरकारविरोधी जनमत राज्यात असल्याचा विरोधी पक्षांचा समज आहे. त्यामुळे उद्याच्या बंदच्या निमित्ताने भाजपच्या धोरणांना जनता विरोध करते हे दर्शवण्याचा प्रयत्न विरोधी पक्ष करणार आहेत. या बंदला अखिल भारतीय किसान सभेचा गोवा विभाग, सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियनचा गोवा विभाग आणि ऑल इंडिया ट्रेड युनियन कॉंग्रेसच्या राज्य शाखेने पाठिंबा दिला आहे.
कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी नमूद केले आहे, की बंदला कॉंग्रेसचा सक्रिय पाठिंबा आहे. भांडवलदारांच्या हवाली कृषी क्षेत्र करण्यास कॉंग्रेसचा विरोध आहे. यानिमित्ताने पणजीच्या आझाद मैदानावर सकाळी १०.३० वाजता कॉंग्रेस धरणे आंदोलन करणार आहे.  गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनीही बंदला पक्षाचा पाठिंबा असल्याचे नमूद केले आहे. तसेच आपनेही बंदला पाठिंबा दिला आहे. बंदचा प्रभाव राज्यात जाणवू नये, यासाठी सरकारने पूर्ण खबरदारी घेतली आहे. पोलिसांच्या गस्त वाढवण्यात येणार आहे. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com