गोव्यात 18 जून पर्यंत मुसळधार पावसाची शक्यता ऑरेंज अलर्ट जारी 
mansoon 2.jpg

गोव्यात 18 जून पर्यंत मुसळधार पावसाची शक्यता ऑरेंज अलर्ट जारी 

अरबी समुद्रात (Arabian Sea) निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पश्चिम किनारपट्टीवर मुसळधार पाऊस पडत असून 18 जून पर्यंत मुसळधार पावसाची शक्यता गोवा वेधशाळेने (Goa Observatory) व्यक्त केली आहे. त्यामुळे दक्षतेचा ऑरेंज अलर्ट (Orange alert) जारी करण्यात आला आहे.

अरबी समुद्रातील निर्माण झालेल्या रेनटर्फ आणि कमी दाबाच्या स्थितीमुळे गोव्यात गेली 24 तासात मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे जनजीवन काहीसे थंडावलेला आहे. गोव्यात सध्या संचारबंदी (Curfew) असल्याने वाहतुकीवर मर्यादा असल्याने वाहतूकीची मोठी कोंडी झाली नाही. मात्र गेल्या दोन दिवसांपासून घाट माथ्यावर पडत असलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साठले आहे. (Orange alert issued for heavy rains in Goa till June 18)

गेल्या चोवीस तासात 102 मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून सर्वाधिक पाऊस पेडणे येथे 152 मिलिमीटर पडला आहे. तर सांगे, केपे, काणकोण आणि मुरगाव येथेही मुसळधार पाऊस पडला आहे. गोव्यात पडणाऱ्या पावसाचा सर्वाधिक फटका राष्ट्रीय महामार्गाच्या सुरू असलेल्या कामाला बसला आहे .काही ठिकाणी हे काम बंद पडले आहे तर काही ठिकाणी धीम्या गतीने सुरु आहे. त्यामुळे प्रवाशाना याचा त्रास होत आहे.

अरबी समुद्रात निर्माण झालेली ढगांची स्थिती आणि वाऱ्याचा वेग यामुळे 18 जून पर्यंत गोव्यासह दक्षिण कोकणात  मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता गोवा वेधशाळेने व्यक्त केली आहे. त्यामुळे  ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे सध्या मासेमारी बंद असली तरी पारंपरिक मच्छीमारांनाही समुद्रात जाण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे.

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com