GOA DIGITAL TAXI : राज्यातील सर्व प्रकारच्या टॅक्सींना डिजीटल मीटर्स लागू करण्याचा आदेश

taxi.jpg
taxi.jpg

पणजी : राज्यातील सर्व प्रकारच्या टॅक्सींना डिजीटल मीटर्स (Digital meters) लागू करण्याचा आदेश वाहतूक खात्याने (Department of Transportation) काढला आहे. या आदेशाला कॉन्ट्रॅक्ट कॅरिजेस (Contract carriages) व मोटार कॅबने आव्हान दिले होते. गोवा (goa) (Department of Transportation) मोटार कायद्यातच त्याची तरतूद असल्याने ही याचिका मागे घेण्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या (Mumbai High Court) गोवा खंडपीठाने मान्यता देताना कायद्यातील नियम 140 ला आव्हान देण्यास याचिकादाराला मुभा दिली आहे. 

सॅनफोर्ड बार्रेटो (Sanford Barreto) व इतरांनी कॉन्ट्रॅक्ट कॅरिजेस व मोटार कॅब या वाहनांना डिजीटल मीटर्सचा वाहतूक खात्याचा आदेश लागू होत नाही.ही वाहने टॅक्सी कायद्याखाली येत नाहीत. केंद्रीय कायद्याखाली या वाहनांचा वेगळ्या गटात समावेश करण्यात आला आहे. कॉन्ट्रॅक्ट केलेल्या वाहनांसाठी डिजीटल मीटर्सचा आदेश लागू होत नसल्याचा दावा याचिकादारच्या वकिलांनी केला. त्याला आक्षेप घेत सरकारतर्फे (government) ॲडव्होकेट (Advocate) जनरल देविदास पांगम यांनी ही दोन्ही प्रकारची वाहने कायद्याच्या नियम 140 नुसार टॅक्सी कायद्याखाली येत असून त्यांचा त्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. ही वाहने प्रवासी नेतात त्यामुळे त्याना त्यातून वगळता येत नाही. त्यामुळे ही याचिका फेटाळण्याची विनंती त्यांनी केली.

यावेळी गोवा खंडपीठाने याचिकादाराला सांगितले की, कायद्यातील नियम 140 नुसार कॉन्ट्रॅक्ट कॅरिजेस व मोटार कॅब याना डिजीटल मीटर्स लावण्याचा आदेश लागू होतो. त्यामुळे याचिकादाराने या नियमामध्ये दुरुस्ती करण्यासाठी किंवा अवैध ठरवून त्याला आव्हान देता येते. त्यामुळे जर तसे करायचे असल्यास नव्याने याचिका सादर करण्यासाठी मुभा देण्यात येईल असे स्पष्ट केले. या याचिकेतच दुरुस्ती करण्यासाठी परवानगी देण्याची विनंती याचिकादाराने केली, मात्र फेटाळण्यात आली. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com