जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेला आदेश मागे घ्यावा

गोमंतक वृत्तसेवा
रविवार, 1 नोव्हेंबर 2020

रेल्वे रुळाचे दुपदरीकरण करण्यासाठी १ नोव्हेंबर रोजी चांदर परिसरातील रस्ता अडवून दुपदरीकरणाचे काम सुरू ठेवण्याचा दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेला आदेश मागे घ्यावा, यासाठी शुक्रवारी ‘गोंयात कोळसो नाका संघटने’ने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. 

सासष्ट :रेल्वे रुळाचे दुपदरीकरण करण्यासाठी १ नोव्हेंबर रोजी चांदर परिसरातील रस्ता अडवून दुपदरीकरणाचे काम सुरू ठेवण्याचा दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेला आदेश मागे घ्यावा, यासाठी शुक्रवारी ‘गोंयात कोळसो नाका संघटने’ने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. 

हा आदेश मागे न घेतल्यास रस्त्यांवर येऊन कामास विरोध केला जाईल, असा इशारा गोयात कोळसो नाका संघटनेच्या अभिजित प्रभुदेसाई यांनी 
केला.
रेल्वे अधिकाऱ्यांनी संबंधित पंचायतीकडून कुठल्याही प्रकारची परवानगी न घेता या कामास सुरवात केल्याचे जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी १ नोव्हेंबर रोजी चांदर परिसरात रस्ता अडवून दुपदरीकरणाचे काम करण्याचा आदेश दिला आहे. हा आदेश मागे घेण्यासाठी निवेदन सादर करण्यात आले आहे. रेल्वे अधिकाऱ्यांना पंचायत व संबंधित लागणाऱ्या सर्व परवानगी घेऊनच रेल्वे क्रॉसिंगवर काम करण्याचा आदेश दिला होता असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले असून या कामासाठी परवानगी घेतलेली नसल्यास याप्रकरणी चौकशी करण्यात येणार, असे अभिजित यांनी सांगितले.

सांजुझे आरियल येथे पंचायतीकडून परवानगी न घेता रेल्वे रुळांच्या दुपदरीकरणाचे काम करण्यात येत असल्यामुळे विरोध करण्यात आला होता. मात्र यावेळी रेल्वे अधिकाऱ्यांनी अरेरावी करून काम पूर्ण केले असे अभिजित प्रभुदेसाई यांनी सांगितले. कोळसा वाहतुकीवर बंदी आणण्यासाठी सर्वपरिने सरकारला समजविण्याचा प्रयत्न करण्यात येत असून सरकारनेही यावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे, असेही त्यांनी सांगितले.

संबंधित बातम्या