काणकोण मामलेदार कार्यालयातर्फे मतदार जागृती फेरी

organisation team of Canacona said The right to vote is a constitutional right
organisation team of Canacona said The right to vote is a constitutional right

काणकोण: काणकोण मामलेदार कार्यालयातर्फे काल काणकोणात मतदार जागृती फेरी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. मतदार यादीत नाव नोंदणी करण्यासाठी १५ डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. मतदानाचा अधिकार हा घटनात्मक अधिकार आहे. त्यासाठी प्रत्येक अठरा वर्षांवरील नागरिकाने आपले नाव मतदार यादीत समाविष्ट करून मतदानाचा अधिकार बजावणे गरजेचे आहे, असे काणकोणचे मामलेदार विमोद दलाल यांनी सांगितले.


यावेळी काणकोणचे उपजिल्हाधिकारी सतीश प्रभू उपस्थित होते. या जागृती फेरीत जागृतीसाठी मामलेदार कार्यालयाने श्री मल्लिकार्जुन आणि चेतन मंजू देसाई महाविद्यालयाच्या एनसीसी कॅडेटचा एक व्हिडिओ तयार केला आहे. या जागृती फेरीत बीएलओ व सरकारी कर्मचाऱ्यांनी भाग घेतला. 


काणकोण मामलेदार कार्यालय ते कदंब बसस्थानक व परत अशी ही जागृती फेरी काढण्यात आली. कोरोना महामारीसंदर्भातील सर्व निर्बंध पाळून या जागृती फेरीचे आयोजन करण्यात आले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com