जागतिक पोलिओ दिनी सायकल रॅलीचे आयोजन

जागतिक पोलिओ दिनी सायकल रॅलीचे आयोजन
Organizing bicycle rallies as part of public awareness on World Polio Day

कुडचडे : पोलिओ या साथीचे  जागतिक निर्मूलन झाले असले तरी भविष्यात ती परत आपल्या राज्यात होऊ नये म्हणून आरोग्य खाते दक्षता घेत असुन वेळोवेळी आपल्या मुलांना आरोग्यखात्याच्या नियमानुसार डोझ देण्यासाठी घराबाहेर पडणे आवश्यक असुन जनतेने या आवाहनाकडे दुर्लक्ष न करता आपल्या बाळाची काळजी घेण्याचे आवाहन कुडचडे पालिका नगराध्यक्ष बाळकृष्ण होडारकर यांनी कुडचडे येथे केले. 


   ते कुडचडे सावर्डे रोटरी क्लब ने आयोजित केलेल्या जागतिक पोलिओ दिनाच्या दिवशी जनजागृतीचा एक भाग म्हणून सायकल रॅलीचे आयोजन प्रसंगी शिवाजी चौकात झेंडा दाखवून शुभारंभ केल्या नंतर ते बोलत होते. या वेळी त्याच्या सोबत रोटरी क्लब अध्यक्ष सिद्देश नाईक तारी, सचिव शांतेश सावर्डेकर, प्रकल्प संयोजक डॉ. परेश कामत, डॉ. विष्णू शेलडेकर, विनायक चोडणेकर, अशोक नाईक, अत्रेय काकोडकर, डॉ. प्रज्ञा काकोडकर सहित क्लबचे सदस्य मोठया संख्येने रॅलीत सहभागी झाले होते. 


       यावेळी अध्यक्ष सिद्देश नाईक तारी यांनी सहभागी झालेल्यांचे स्वागत केले तर प्रकल्प संयोजक डॉ. परेश कामत यांनी रॅली मागची भावना स्पष्ट केली तर सचिव शांतेश सावर्डेकर यांनी आभार व्यक्त केले. सायकल रॅली संपूर्ण कुडचडे परिसरात फिरविण्यात आली. 
 

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com