सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त  सायकल रॅलीचे आयोजन
National Unity Day: नगरविकास मंत्री मिलिंद नाईक यांनी झेंडा दाखविल्यावर रॅली गोव्याहून मुरगाव येथून रवाना होतानाDainik Gomantak

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त सायकल रॅलीचे आयोजन

सडा येथे नगरविकास मंत्री मिलिंद नाईक यांनी झेंडा दाखविल्यावर रॅली गोव्याहून रवाना झाली.

दाबोळी: केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने सरदार वल्लभभाई पटेल (Sardar Vallabhbhai Patel) यांच्या 146 व्या जयंतीनिमित्त आयोजित केलेली सायकल रॅली मुरगावातून मार्गस्थ झाली. सडा येथे नगरविकास मंत्री मिलिंद नाईक यांनी झेंडा दाखविल्यावर रॅली गोव्याहून रवाना झाली. नाईक यांनी या रॅली आयोजनाबद्दल आयोजकाचे कौतुक केले.

National Unity Day: नगरविकास मंत्री मिलिंद नाईक यांनी झेंडा दाखविल्यावर रॅली गोव्याहून मुरगाव येथून रवाना होताना
पर्यटकांची चार्टर विमानाने 15 ऑक्टोबर पासून गोव्यात उतरणार

राष्ट्रीय एकता दिनानिमित्त केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने तिरुअनंतपुरम ते केवडिया या दरम्यान सायकल रॅलीचे आयोजन केले आहे. ही रॅली गोवा, कर्नाटक, महाराष्ट्रातून स्टॅच्यू ऑफ युनिटी केवडिया गुजरात येथे 26 रोजीपोहचेल. सदर रॅलीत 16 जवानांसह 25 जणांचा चमू आहे. ही रॅली 11 रोजी गोव्यात पोहोचली होती. या चमूला सडा येथील एमपीटीच्या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या केंद्रातर्फेपुढील प्रवासासाठी निरोप देण्यात आला. याप्रसंगी मंत्री मिलिंद नाईक, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे डेप्युटी कमांडंट गुरुप्रसाद राय, वाहतूकव्यवस्थापक हिमांशू शेखर उपस्थित होते. या रॅलीला गोवा पोलिस बँड पथकाने सलामी दिली. गोव्याहून निघालेली रॅली पुढच्या टप्प्यात बेळगावी पोहचेल.

Related Stories

No stories found.