'लोकांशी संपर्क साधण्यासाठी जनता दरबाराचे आयोजन'

गोमंतक वृत्तसेवा
गुरुवार, 25 फेब्रुवारी 2021

लोकांचे प्रश्न सोडवणे आमचे कर्तव्य आणि सरकार म्हणून जबाबदारीही आहे.

म्हापसा: लोकांच्या समस्या आणि अडचणी सोडवण्यासाठी राज्यातील प्रत्येक तालुक्यात बैठकांचे आयोजन केले होते. पण पालिका निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यामुळे ते शक्य झाले नाही. तरीही पक्षाच्या कार्यालयांमध्ये लोकांशी संपर्क साधण्यासाठी जनता दरबाराचे आयोजन केल्याचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी सांगितले. म्हापसा येथील सीम खोरलि येथे आयोजित जनता दरबार संपल्यानंतर पत्रकारांशी ते बोलत होते. सीम - खोरली येथे आज बुधवारी सकाळी 11.30 मुख्यमंत्र्यांनी भरवलेल्या जनता दरबारास नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. 

संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांना गोवा मेडिकल कॉलेजमधून डिस्चार्ज

यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, लोकांनी अनेक समस्या मांडल्या. पंचायत पातळीपासून विविध खात्याच्या संचालनालय संबधीत समस्याही नागरिकांनी माझ्यासमोर मांडल्या. युवा - युवतींनी रोजगार आणि नोकरीची समस्या मांडली. मी सर्व अडचणी, प्रश्न, समस्या ऐकल्या आहेत. ज्या लगेच सोडवणे शक्य आहे त्या तातडीने सोडवू तर सार्वजनिक समस्या आचारसंहिता संपताच सोडवल्या जातील, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

गोव्यातील कुडचडे रेल्वे स्थानकात धावत्या रेल्वेचे डबे अचानक घसरले

लोकांचे प्रश्न सोडवणे आमचे कर्तव्य आणि सरकार म्हणून जबाबदारीही आहे. कोरोना महामारी मुळे आलेल्या अनेक अडचणींवर आणि समस्यांवर मात करून आमचे सरकार कार्यरत आहे. यापुढेही असेच कार्यरत राहील, असे मुख्यमंत्री म्हणाले.

भाजपच्या येथील कार्यालयात आज 25 रोजी लोकांच्या समस्या, अडचणी आणि प्रश्न ऐकण्यासाठी या जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी म्हापाशाचे आमदार जोशुवा डिसोझा, सरपंच, पंच आणि नगरसेवक उपस्थित होते. 

संबंधित बातम्या