पेडणे तालुक्यातील किनाऱ्यांवर पार्ट्यांचे आयोजन; वाहतूक कोंडीची समस्या कायम

पेडणे तालुक्यात मोरजी, आश्वे, मांद्रे आणि हरमल या किनारी भागांत नाताळनिमित्त आलेले पर्यटक मावळत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नववर्षाचे स्वागत करण्यासाठी स्थिरावले आहेत.
Beach party Pernem taluka 

Beach party Pernem taluka 

Dainik Gomantak 

मोरजी: मावळत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाचे (New Year) स्वागत करण्यासाठी पेडणे तालुक्यातील किनाऱ्यांवर पर्यटकांचे जत्थेच्या जत्थे येऊ लागले असून किनारी भागांना अक्षरश: जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले आहे. मात्र, दरवर्षीप्रमाणे अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी होत असून पार्किंग व्यवस्थेचे तीन तेरा झालेले दिसून येतात.

<div class="paragraphs"><p>Beach party Pernem taluka&nbsp;</p></div>
कोरोनाचे निर्बंध कागदावरच; किनाऱ्यांवर पर्यटकांची गर्दी

देश-विदेशातून आलेल्या पर्यटकांचे (Tourists) जय्यत स्वागत करण्यासाठी किनारे सजले आहेत. आकर्षक रोषणाई, रंगीबेरंगी पताका, सजावट आणि ठिकठिकाणी पार्ट्यांचे फलक दिसत आहेत. पेडणे तालुक्यातील किनारी भागात किमान 25 जंगी पार्ट्यांचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र, कोविड-19 (COVID-19) महामारीचे उग्र रूप धारण केले असतानाही या पार्ट्यांना परवानगी आहे की नाही, हा एक संशोधनाचा विषय ठरला आहे.

पेडणे (Pernem) तालुक्यात मोरजी, आश्वे, मांद्रे आणि हरमल या किनारी भागांत नाताळनिमित्त आलेले पर्यटक मावळत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नववर्षाचे स्वागत करण्यासाठी स्थिरावले आहेत. या पर्यटकांचे मनोरंजन (Entertainment) करण्यासाठी अनेक ठिकाणी जंगी पार्ट्यांचे आयोजन केले आहे. या पार्ट्यांमध्ये किमान 30 ते 35 हजार पर्यटक सहभागी होणार असल्याचा अंदाज आहे. ज्या ठिकाणी पार्ट्यांचे आयोजन केले आहे, त्या आयोजकांनी पार्किंगसाठी सभोवतालची जागा आरक्षित केली आहे. मात्र, किनारी भागात पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटक, नागरिकांसाठी पार्किंगची सोय नाही. त्यामुळे त्यांना दूरवर वाहने पार्क करून किनाऱ्यावर यावे लागते.

<div class="paragraphs"><p>Beach party Pernem taluka&nbsp;</p></div>
'शिक्षणातून वैचारिक आणि बौद्धिक विकास होणे ही आजच्या युगाची गरज'

हॉटेल, गेस्ट हाऊस फुल्ल

किनारी भागातील सर्वच हॉटेल (Hotel), गेस्ट हाऊस, भाडोत्री घरे, खोल्या देशी-विदेशी पर्यटकांनी आगावू आरक्षित केले आहेत. यंदा देशी पर्यटकांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येते. 25 डिसेंबर ते 2 जानेवारी या काळात दर दिवसाला खोल्यांचे भाडे तीन हजार ते सात हजार रुपये आकारले जाते. तर सिंगल बेडरूम, किचन, हॉल यासाठी 40 ते 50 हजार रुपये प्रत्येक महिन्याला भाडे आकारले जाते. पार्ट्यांसाठी प्रवेश शुल्क 500 ते दहा हजार आकारले जाते. याची जाहिरातबाजी समाज माध्यमांसह गावागावांत भले मोठे पोस्टर लावून केली जाते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com