Goa: नवरात्रोत्सवानिमित्त शांतादुर्गा देवस्थानात विविध कार्यक्रमांचे आयोजन

येत्या गुरुवारी घटस्थापनेने नवरात्री उत्सवाला (Navratri festival) प्रारंभ होणार असून, 14 ऑक्टोबर रोजी या उत्सवाची सांगता होणार आहे.
Goa: नवरात्रोत्सवानिमित्त शांतादुर्गा देवस्थानात
विविध कार्यक्रमांचे आयोजन
Shantadurga templeDainik Gomantak

डिचोली: गावकरवाडा-डिचोली (Bicholim) येथील श्री शांतादुर्गा देवस्थानात वार्षिक नवरात्रोत्सव विविध कार्यक्रमांनिशी साजरा करण्यात येणार आहे. त्यानिमित्त 'शतचंडी महोत्सव' (Shatchandi Festival) साजरा करण्यात येणार असून, नवरात्रोत्सव काळात नऊही रात्री पुणे येथील प्रसिद्ध कीर्तनकार ह. भ. प. रामनाथ रामचंद्र अय्यरबुवा (Ramnath Ramachandra Iyerbuva) यांचे कीर्तन होणार आहे. येत्या गुरुवारी घटस्थापनेने नवरात्री उत्सवाला प्रारंभ होणार असून, 14 ऑक्टोबर रोजी या उत्सवाची सांगता होणार आहे.

नवरात्र उत्सव

गुरुवारी सकाळी चार चौगुलेकडून देवीस अभिषेक आदी धार्मिक विधी होणार आहेत. नंतर घटस्थापना, नवचंडी झाल्यानंतर आरती व तिर्थप्रसाद होणार आहे. सायंकाळी 6 वा. मये येथील देवराय कारबोटकर आणि भजनी ग्रूपतर्फे भजन होणार आहे. रात्री 9 वा. कीर्तन होणार आहे. शुक्रवारी सकाळी 8 ते दुपारी 12.30 वाजेपर्यंत सुवासिनींतर्फे कुंकूमार्चन सायंकाळी 6 वा. डिचोली येथील अमित मोरजकर आणि भजनी ग्रूपतर्फे भजन होणार आहे. रात्री 9 वा. कीर्तन होणार आहे. शनिवारी सकाळी ते दुपारपर्यंत सुवासिनींतर्फे कुंकूमार्चन,सायंकाळी 6 वा. डिचोली येथील सूरज सहकारी आणि साथी कलाकारांचे भजन होणार आहे. रात्री 9 वा. कीर्तन होणार आहे. रविवारी सकाळी ते दुपारपर्यंत सुवासिनींतर्फे कुंकूमार्चन, सकाळी 9 वा. सामुदायिक 101 सत्यनारायण पूजा होणार आहे. सायंकाळी 6 वा. शिवोली येथील स्वामी समर्थ भजनी मंडळाचे भजन होणार आहे. रात्री 9 वा. कीर्तन झाल्यानंतर मखरोत्सव होणार आहे.

Shantadurga temple
Goa Election 2022: राजकीय पक्षांची तोंडाची बॅटिंग सुरु...

सोमवारी सकाळी ते दुपारपर्यंत सुवासिनींतर्फे कुंकूमार्चन, सायंकाळी 6 वा. शिरगाव येथील श्री लईराई देवी प्रासादिक भजनी ग्रूपतर्फे भजन होणार आहे. रात्री 9 वा. कीर्तन झाल्यानंतर मखरोत्सव होणार आहे. मंगळवारी सकाळी ते दुपारपर्यंत सुवासिनींतर्फे कुंकूमार्चन, सायंकाळी 6 वा. मये येथील श्री महामाया भजनी मंडळातर्फे भजन होणार आहे. रात्री 9 वा. कीर्तन झाल्यानंतर मखरोत्सव होणार आहे. बुधवारी सकाळी ते दुपारपर्यंत सुवासिनींतर्फे कुंकूमार्चन, सायंकाळी 6 वा. बोर्डे येथील ग्रामस्थ भजनी मंडळातर्फे भजन होणार आहे. रात्री 9 वा. कीर्तन झाल्यानंतर मखरोत्सव होणार आहे. गुरुवारी सकाळी ते दुपारपर्यंत सुवासिनींतर्फे कुंकूमार्चन, सायंकाळी 6 वा. वाळपई येथील देव दळवी भजनी मंडळातर्फे भजन होणार आहे. रात्री 9 वा. कीर्तन झाल्यानंतर मखरोत्सव होणार आहे. दरम्यान, श्री रवळनाथ आणि भूतनाथ देवांची तरंगे सजविण्यात आल्यानंतर श्री नवदुर्गा मूर्तींचे विसर्जन करण्यात येणार आहे.

15 रोजी दसरोत्सव

या देवस्थानचा वार्षिक दसरोत्सव येत्या 15 रोजी पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात येणार आहे. त्यानिमित्त सकाळी देवीस महाभिषेक आदी विधी होणार आहेत. सायंकाळी 5 वा. तरंगांची पूजा नंतर सिमोलंघन, सोने लुटणे आदी कार्यक्रमांनिशी दासरोत्सव साजरा करण्यात येणार आहे. अशी माहिती श्री शांतादुर्गा देवस्थान ग्रामस्थ गावकर मंडळाने दिली.

Related Stories

No stories found.