गोव्यातील प्राथमिक शाळांच्या विलिनीकरणाची संकल्‍पना केंद्राची

शिक्षण संचालक: गरजेनुसार आणखी बालरथ पुरविणार
Goa School Education
Goa School EducationDainik Gomantak

पणजी: राज्‍यातील एकशिक्षकी सरकारी प्राथमिक शाळांचे विलिनीकरण करण्याची मूळ संकल्‍पना केंद्र सरकारची आहे. या निर्णयाशी राज्‍य सरकारचा काही संबंध नाही, अशी माहिती शिक्षण संचालक शैलेश झिंगडे यांनी दिली. पण या निर्णयाचा विद्यार्थी तसेच पालकांना काही त्रास होणार नाही. आवश्‍यक त्‍या ठिकाणी आणखी बालरथ पुरविल्‍या जातील. शाळांची संख्या कमी होईल, पण विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही, अशी माहिती त्‍यांनी दिली.

( Original idea of merging the schools in Goa was the central government and not the state government )

राज्‍यातील एकशिक्षकी मराठी आणि कोकणी सरकारी प्राथमिक शाळांचे विलीनीकरण होणार, या वृत्ताने राज्‍यात विशेषतः ग्रामीण आणि दुर्गम भागातील पालकांत खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर शिक्षण संचालक झिंगडे यांना विचारले असता त्‍यांनी वरीलप्रमाणे उत्तर दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 16 आणि 17 जून रोजी देशातील सर्व राज्‍यांच्‍या मुख्य सचिवांची बैठक बोलावली होती.

Goa School Education
‘आयआयटीसाठी शेतजमीनच का हवी?’; काँग्रेसचा सवाल

त्‍या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्‍याचे झिंगडे यांनी सांगितले. देशातील बहुतांश राज्‍यात एक शिक्षकी सरकारी प्राथमिक शाळा आहेत. सरकारी शाळांतील पटसंख्या घटत असल्‍याने सरकारला अशा शाळा एका शिक्षकांवर चालवाव्‍या लागत आहेत.

Goa School Education
National Night Out 2022: गोव्याचे हे समुद्रकिनारे नाईट लाइफसाठी सर्वोत्तम

गेल्‍या दीड-दोन दशकांत खासगी शाळांचा सुळसुळाट वाढल्‍याने बहुतांश पालकांचा कल खासगी शाळांकडे दिसून येत आहे. यामुळे सरकारी शाळांमधील पटसंख्या कमी होताना दिसत आहे. अर्थात याला राज्‍य सरकारही तितकेच जबाबदार आहेत. कारण मागेल त्‍याला शाळा मंजूर केल्‍यामुळे राज्‍यात शाळांचे पेव वाढले आहे. सरकार अनेक खासगी शाळांना अनुदान देते. त्‍यांना सर्व सरकारी सोयी-सुविधा पुरवल्‍या जातात. तसेच बालरथही पुरविल्‍या जातात.

शाळांचे विलिनीकरण झाल्‍यास विद्यार्थ्यांचाही लाभ होईल. अशा शाळांना सरकार अधिक सोयी - सुविधा पुरवू शकेल. तसेच आवश्‍यकता भासल्‍यास आणखी बालरथ पुरविले जातील. नियमांप्रमाणे शाळेत 45 पेक्षा अधिक पटसंख्या झाल्‍यास त्‍या शाळेत मुख्याध्यापकांचीही नेमणूक करता येईल. याला लाभ सर्वांना होईल, असे शिक्षण संचालक झिंगडे म्‍हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com