ओस्बान व रमेशची जन्मठेप कायम

Vilas Mahadik
शनिवार, 8 ऑगस्ट 2020

आठ वर्षांपूर्वी राज्यात खळबळ माजवून दिलेल्या मेरशी येथील मजूर दांपत्याचा गळा आवळून खून केल्याप्रकरणी आरोपी ओस्बान लुकास फर्नांडिस (मेरशी) व रमेश तयाजी बागवे (सिंधुदुर्ग) या दोघांना झालेली जन्मठेपेची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने कायम केली. त्या दोघांनी शिक्षेला आव्हान दिलेले अर्ज फेटाळण्यात आले.

विलास महाडिक

पणजी :

आठ वर्षांपूर्वी राज्यात खळबळ माजवून दिलेल्या मेरशी येथील मजूर दांपत्याचा गळा आवळून खून केल्याप्रकरणी आरोपी ओस्बान लुकास फर्नांडिस (मेरशी) व रमेश तयाजी बागवे (सिंधुदुर्ग) या दोघांना झालेली जन्मठेपेची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने कायम केली. त्या दोघांनी शिक्षेला आव्हान दिलेले अर्ज फेटाळण्यात आले.
आरोपीच्या बांधकाम सामान विक्रेत्या फार्म हाऊसच्या ठिकाणी राहत असलेल्या शिवाजी नाईक व त्याची पत्नी सुजाता नाईक या दोघांचा खून केल्याप्रकरणी बाल न्यायालयाने त्या दोघांनाही जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. या खुनाच्यावेळी प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असल्याने त्यांच्यावरील आरोप सिद्ध झाले होते. या शिक्षेला त्यानी आव्हान दिले होते. आज गोवा खंडपीठाने त्यांचे आव्हान अर्ज फेटाळण्यात येत असल्याचा निवाडा दिला. कुळे पोलिसांनी आरोपी ओस्बान फर्नांडिस याला फाशी देण्यासाठी केलेला अर्जही खंडपीठाने शिक्षा कायम ठेवताना फेटाळला. या आव्हान अर्जावरील सुनावणीवेळी सरकारतर्फे ज्येष्ठ वकील एस. रिवणकर यांनी बाजू मांडली तर अर्जदारतर्फे वकील अरुण ब्रास डिसा यांनी बाजू मांडली.

काय आहे प्रकरण?
शिवाजी नाईक हा आरोपी ओस्बान फर्नांडिस याच्याकडे कामाला होता व तो आपल्या कुटुंबासह तेथेच असलेल्या झोपड्यामध्ये राहत होता. आरोपी व शिवाजी याच्यामध्ये बाचाबाचीतून झालेल्या मारहाणीत शिवाजी याचा मृत्यू झाला होता. हे प्रकरणाला वाचा फुटू नये म्हणून त्याला तेथील परिसरात रात्रीच्यावेळी खड्डा खोदून त्याचा मृतदेह आरोपींनी पुरला होता. त्यानंतर पत्नी सुजाता हिने पतीची चौकशी करण्यास सुरू केल्यावर तिचाही काटा काढण्यासाठी आरोपी ओस्बान याने तिला व दोन मुलांना अनमोड घाटात घेऊन गेला. तेथे त्याने सुजाताचा गळा आवळून खून केला व तिला घाटात टाकून दिले. कोणताही पुरावा राहू नये म्हणून मुलांचाही गळा दाबला व काळोखात त्यांना रस्त्याच्या कडेला टाकून पळून गेले होते.

मुले वाचली आणि लागला सुगावा
वेर्णा येथील बोनावेंटर डिसोझा हे गाडीने अनमोड घाटातून गोव्यात येत असताना त्यांना रस्त्याच्या बाजूला एक लहान मुलगी दिसली. त्यांना हे प्रकरण संशयास्पद वाटल्याने त्याची कुळे पोलिसांना माहिती दिली. या प्रकरणाची सखोल चौकशी केली असता शिवाजी व सुजाता या दांपत्याच्या मुलांना वाचविण्यात पोलिसांना यश आले. या मुलांच्या जबान्या नोंद केल्यानंतर मिळालेल्या पुराव्याच्या आधारे तपास केला असता या संपूर्ण प्रकरणामागे आरोपी ओस्बान फर्नांडिस व त्याला मदत करणारा रमेश बागवे असल्याचे पुराव्यानिशी सिद्ध झाले.

 

संपादन : महेश तांडेल

 

 

संबंधित बातम्या