Goa Railway: ... अन्यथा रेल रोको आंदोलन होईलच!

काणकोण मधील ज्येष्ठ नागरिक व समविचारी नागरिकांनी दिला आंदोलनाचा इशारा
Goa Railway
Goa RailwayDainik gomantak

लांब पल्ल्याच्या रेल गाड्यांना काणकोणात थांबा न दिल्यास पंधरा दिवसानंतर रेल रोको आंदोलनाचा इशारा आज काणकोण मधील ज्येष्ठ नागरिक व समविचारी नागरिकांनी दिला आहे. Goa Railway

आज कोकण रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक बी.पी.निकम यांनी काणकोणात मामलेदार कार्यालयाच्या सभागृहात मामलेदार मनोज कोरगावकर यांच्या उपस्थितीत झिरो बेस पॉलिसीमुळे काणकोणात लांब पल्ल्याच्या गाड्यांना थांबा देणे शक्य नसल्याचे स्पष्ट केले

त्यानंतर नागरिकांनी विभागीय व्यवस्थापक निकम यांना मागणी पूर्ण करण्यासाठी पंधरा दिवसांची मुदत दिली. यावेळी कोकण रेल्वेचे ज्येष्ठ वाहतूक अधिकारी सुनील नारकर, पोलिस निरीक्षक चंद्रकांत गावस उपस्थित होते. राजेंद्र देसाई, शांताजी नाईक गावकर, अनिल भगत, संदेश तेलेकर, नगरसेवक धिरज नाईक गावकर, बबेश बोरकर, उल्हास भाटीकर यांनी आपल्या भावना मांडल्या.

Goa Railway
Goa Railway: लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांना थांबा द्या अन्यथा...

काणकोण रेल्वे स्थानकावर लांब पल्ल्याच्या गाड्यांना थांबा देण्याची येथील नागरिकांची प्रलंबित मागणी असून रेल्वे अधिकारी आणि लोकप्रतिनिधी त्या मागणीकडे आजपर्यंत दुर्लक्ष करत आहेत. त्यासाठी त्यांना जाग आणण्यासाठी आंदोलनाशिवाय दुसरा पर्याय राहिला नसल्याचे जनार्दन भंडारी यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com