ओल्ड गोवामधील नागरीकांच्या आंदोलनाला आमचा पूर्ण पाठिंबा: फ्रांसिस सार्दीन

बांधकामाविरुद्ध नागरीकांनी जे आंदोलन केले त्यास आपला पूर्ण पाठिंबा असल्याचे दक्षिण गोव्याचे खासदार फ्रांसिस सार्दिन (Francisco Sardinha) यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
ओल्ड गोवामधील नागरीकांच्या आंदोलनाला आमचा पूर्ण पाठिंबा: फ्रांसिस सार्दीन
Francisco SardinhaDainik Gomantak

फातोर्डा: ओल्ड गोवा (Old Goa) येथील सेंट केजितन चर्चची एक वारसा जमीन बळकावण्याच्या प्रयत्नाविरुद्ध व तिथे बांधकामाविरुद्ध नागरीकांनी जे आंदोलन केले त्यास आपला पूर्ण पाठिंबा असल्याचे दक्षिण गोव्याचे खासदार फ्रांसिस सार्दिन (Francisco Sardinha) यानी पत्रकार परिषदेत सांगितले. या वारसा जमिनीत बांधकाम करण्याचा परवाना सरकारने दिलाच कसा असा प्रश्र्न उपस्थित होत आहे. तसेच पुरातत्व खात्याच्या अभियंत्यानी ही बाब सरकारच्या निदर्शनास आणुन द्यायला पाहिजे होती. ही बाब आपण लोकसभेत उपस्थित करणार असुन भाजपचे कार्यकर्ते पक्षाची हानी कशी करीत आहेत हे  संबंधीत केंद्रीय मंत्र्यांच्या लक्षात आणून देणार असेही खासदार सार्दिन यानी सांगितले.

कुडचडे येथील सभागृह खासदार मदतनिधीतुन बांधण्यात आले आहे. त्यामुळे त्याचे उदघाटन खासदाराहस्ते होणे क्रमप्राप्त होते. मात्र मंत्र्याने त्याचे उदघाटन केल्याने त्यानी नाराजी व्यक्त केली. सरकारलाच जर उदघाटन करायचे असते तर त्यांनी आपल्याला आमंत्रीत करायला पाहिजे होते. या बाबतीत सरकारने काही नियम व प्राधान्यक्रम पाळावे असा सल्ला खासदारानी या वेळी दिला. गोवा हे पर्यंटनासाठी प्रसिद्ध असे राज्य आहे. त्यामुळे रस्ता त्वरित दुरुस्त करणे गरजेचे आहे. रस्त्यावरील गतीरोधकही त्वरीत रंगवावे अशी मागणी त्यानी केली.

Francisco Sardinha
पेडणे तालुक्यातील स्थानिक पंचायत मतदार यादीत सीमाभागातील लोकांची नावे!

गोव्यात पोस्टमन हे गोमंतकीय असावे त्यामुळे नागरीकांशी संवाद साधणे शक्य होईल. गोव्याची पोस्ट कचेऱ्या या महाराष्ट्र सर्कलच्या अधिकाराखाली येत आहेत. गेल्या कित्येक वर्षांत गोव्यात स्वतंत्र पोस्टकचेऱ्या असाव्यात ही केलेली मागणी अजुन तशीच आहे. गोव्यात गेल्या 15 वर्षे पोस्टमन आहेत त्यांना नोकरीत कायम गोव्यात गेल्या 15 वर्षे पोस्टमन आहेत त्यांना नोकरीत कायम करावे अशी मागणीही त्यानी केली. गोव्यातील बंदर क्षेत्र वाढवु नये व स्थानिक संस्थाना अधिकार द्यावेत असेही खासदार सार्दिन यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com