कोलवाळ कारागृहात कोरोना संसर्गाचा उद्रेक होण्याची शक्यता

Outbreak of corona infection in Colvale Central Jail
Outbreak of corona infection in Colvale Central Jail

पणजी: कोलवाळ येथील मध्यवर्ती कारागृहात(Colvale Jail) कोरोना संसर्गाचा(Corona)फैलाव वाढत असल्याने कैद्यांमध्ये(Prisoner) घबराटीचे व चिंतेचे वातावरण पसरले आहे. गेल्या 3 दिवसांत 270 कैद्यांची कोविड चाचणी करण्यात आली आहे. त्यापैकी सुमारे 70 जणांचा अहवाल आला आहे. त्यामध्ये 9 कैदी कोरोनाबाधित सापडले आहेत. कारागृहात एकूण 539 कैदी आहेत असून आतापर्यंत कैदी व तुरुंग कर्मचारी मिळून 19 जण कोरोनाबाधित झाले आहेत. दोघा गृहरक्षकांचा मृत्यू झाला आहे.(Outbreak of corona infection in Colvale Central Jail) 

कारागृहात कोरोना संसर्गाचे प्रमाण वाढण्यास सुरुवात झाल्यापासून आवश्‍यक ती उपाययोजना घेण्यास प्रशासनाने सुरवात केली असून प्रत्येकाची थर्मल गनने शारीरिक तापमान मोजल्याशिवाय आतमध्ये सोडले जात नाही. या कारागृहात तुरुंगरक्षक, आयआरबी पोलिस व तसेच कैदी व त्यांना भेटण्यास आलेल्या लोकांची तपासणी केली जाते. पॅरोल किंवा फरलोग संपून कारागृहात परतणाऱ्या कैद्यांना ‘कोरोना’ चाचणी केलेला अहवाल घेऊनच आतमध्ये प्रवेश दिला जातो.

जर चाचणी अहवाल निगेटिव्ह असेल तर त्याला 14 दिवस वेगळ्या खोलीमध्ये अलगीकरणात ठेवण्यात येते, तर चाचणी अहवाल पोझिटिव्ह असेल तर त्याला कारागृहातच एक खोली कोरोना रुग्णांसाठी वेगळी केली आहे त्यामध्ये ठेवले जाते. कैद्यांना जरी तोंडाला मास्क वापरण्याची सक्ती करण्यात येत असली, तरी काहीजण त्याचा वापर न करताच मोकळ्या हवेत त्यांना आणले जाते तेव्हा फिरतात. त्यामुळे संसर्गाचा धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही अशी माहिती सूत्रांनी दिली. 

45 वर्षावरील 70 कैदी 
कोलवाळ मध्यवर्ती कारागृहात सुमारे 70 कैदी हे 45 वर्षांवरील असल्याने त्यांना लसीकरण करण्याची मोहीम लवकर कारागृहामध्ये घेण्यात येणार आहे. वेळोवेळी कारागृहाचे निर्जंतुकीकरण अग्निशमन दलातर्फे करण्यात येत आहे. कारागृहाच्या आरोग्य केंद्रामध्ये प्राणवायू सिलिंडर साठा तात्काळ उपचारासाठी उपलब्ध करण्याच्या प्रक्रियेत आहेत. कारागृहात 200 जणांची क्षमता असलेला सभागृह आहे तो अलगीकरण किंवा कोविड वॉर्ड म्हणून वापरता येणार आहे, अशी माहिती सूत्राने दिली. 

कारागृहात कोरोना संसर्गाचा उद्रेक?

कोलवाळ कारागृहातील आरोग्य केंद्रातील डॉक्टरच सुरुवातीला कोरोना बाधित झाल्यानंतर या फैलावास सुरुवात झाली होती. कारागृहात तपासणीवेळी त्यांच्या संपर्कात आलेल्या कैदी व गृहरक्षकांना कोरोना संसर्ग होण्यास सुरवात झाली होती.  हे डॉक्टर बरे होऊन पुन्हा ड्युटीवर रूजू झाले 
आहेत. एक जेलरही कोरोना बाधित झाला होता तोही बरा होऊन कामावर परतला आहे. काही कैद्यांना कोरोनाची लक्षणे आहेत त्यांना वेगळ्या खोल्यांमध्ये ठेवण्यात आले आहे. कारागृहात कोरोना संसर्गाचा उद्रेक होण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. कोरोना बाधित कैद्यांना कारागृहाच्या तळमजल्यावरील खोली क्रमांक 3 मध्ये ठेवण्यात येणार असून त्याची क्षमता सुमारे 107 आहे. 

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार कारागृहात कोरोना संसर्गाचा फैलाव होऊन त्याचा उद्रेक होण्याची शक्यता आहे, तेथे कारागृहाच्या प्रशासनाने शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांना पॅरोल किंवा फरलोगवर तसेच सात वर्षापेक्षा कमी शिक्षा असलेल्या गुन्ह्यांमध्ये खटला सुरू असलेल्या गुन्हेगारांना जामीन देण्यासंदर्भात सूचना केल्या आहेत. त्याच्या पार्श्‍वभूमीवर उच्च न्यायालय न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली आज बैठक झाली आहे. या बैठकीतील निर्णयानंतर पुढील कार्यवाही होईल अशी माहिती सूत्राने दिली. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com