सत्तरी येथे भारतीय स्टेट बँकेच्या गैरसेवेबद्दल तीव्र संताप
Goa : Outrage over non-service of State Bank of India at Sattari Dainik Gomantak

सत्तरी येथे भारतीय स्टेट बँकेच्या गैरसेवेबद्दल तीव्र संताप

केरीतील जागृत नागरिकांची कुचकामी सेवेला संतापून स्टेट बँकेत धडक, सेवा सुरळीत करण्याची 25 दिवसांचा दिला वेळ, बी एस एन एल च्या नेटवर्क समस्येमुळे बँकेची सेवा होते खंडित

पर्ये : केरी सत्तरीतील जागृत नागरिकांनी भारतीय स्टेट बँकेच्या( State Bank of India- Querim branch) गैरसेवेबद्दल तीव्र संताप व्यक्त करीत थेट बँकेत धडक देत बँक व्यवस्थापकाला जाब विचारला आणि येत्या 25 दिवसापर्यंत इथली सेवा सुरळीत न झाल्यास पुढील कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Goa : Outrage over non-service of State Bank of India at  Sattari
पी चिदंबरम पुन्हा गोवा दौऱ्यावर

केरी भागात भारतीय स्टेट बँकची शाखा असून इथल्या जेष्ठ नागरिक, पेन्शन धारक, विविध योजनांच्या लाभार्थ्यांचा खाते आहे. त्यामुळे ही बँक इथल्या सर्वसामान्य आणि विशेष करून वयोवृद्ध पेन्शन धारकांना बँकिग सेवेचे मोठे ठिकाण आहे. या बँकमध्ये विविध प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेपर्यंत ग्राहकांची मोठी गर्दी असते. पण गेल्या बऱ्याच महिन्यापासून येथील सेवा सुरळीत नसल्याने नागरिकांना यांची मोठा गैरसोय होत आहे.

दरम्यान या सततच्या वाढत्या गैरसोयीमुळे त्रस्त होऊन आज येथील सुमारे 10-12 जागरूक नागरिकांनी बँकेत धडक देत व्यवस्थापकाला पैलावर घेतले. यावेळी विष्णू पारोडकर, तन्वीर पांगम, नामदेव गावस, राजाराम म्हालकर, विठोबा केरकर, आपा म्हालकर, तुकाराम माजीक, नामदेव केरकर, अर्जुन गावस आदी नागरिक उपस्थित होते.

Goa : Outrage over non-service of State Bank of India at  Sattari
राज्यात विद्यपिठाचे प्रशासन ढासळले

बी एस एन एल च्या( BSNL) नेटवर्कअभावी समस्या,

दरम्यान या बँकेच्या गैरसोयीबद्दल बँक व्यवस्थापक यांनी सांगितले की केरी सत्तरीतील भारतीय सेवा निगम लिमिटेड( Bharat Sanchar nigam ltd. ) या दूरध्वनी कंपनीची सेवा वारंवार खंडित होत असल्याने त्याचा परिणाम इथल्या भारतीय स्टेट बँकेच्या सेवेवर होत आहे. गेल्या बऱ्याच काळापासून बी एस एन एल च्या नेटवर्कची समस्या आहे. नेटवर्क नसल्याने आमची बँकची पूर्ण यंत्रणा ठप्प होते. याबद्दल आम्ही संबंधित यंत्रणेशी तक्रार केली आहे. इथली नेटवर्क सेवा सुरळीत व्हावी म्हणून नवीन फायबर केबल( fibre cable) टाकण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. येत्या काही दिवसात हे काम पूर्ण झाल्यावर ही समस्या निर्माण होणार नाही असे त्यांनी सांगितले.

केरीचा परिसर डोंगराळ भाग असल्याने येथे नेटवर्क ची समस्या आहे, तसेच बँक इमारतीवर स्लॅब नसल्याने किंवा येथे अन्य जागा उपलब्ध नसल्याने टॉवर ( mobile tower) ही उभारता येत नाही. त्यामुळे समस्या सुटाऊ झाली नाही असे सांगितले.

Goa : Outrage over non-service of State Bank of India at  Sattari
भाजप च्या पणजी मंडळातर्फे आज आयुर्वेदीक शिबीराचे आयोजन

ग्राहकांना सेवा देण्यासाठी साखळी शाखेची मदत

दरम्यान ही समस्या कायम असल्याने ग्राहकांना सेवा देण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत असे बँक व्यवस्थापकाने सांगितले. ते म्हणाले जे ग्राहक येथे पैसे काढण्यासाठी येतात त्यांचे आम्ही पैसे काढण्याची पावती भरून घेतो, त्यानंतर आमचा एक कॅशियर साखळी येथे स्टेट बँक शाखेत जाऊन त्यांचे पैसे त्यांच्या खात्यातून काढून पुन्हा येथे येऊन त्या ग्राहकांना देतो. या कामासाठी आम्हाला बऱ्याच वेळ लागतो व ग्राहकांना सेवेसाठी उशीर होतो असे त्यांनी सांगितले.पण आम्ही ग्राहकांना पूर्णपणे सेवा देण्याचे प्रयत्न करीत आहोत.

जेष्ठ नागरिकांची होते फरफट

या सगळ्या गैरसोयीचा मोठा फटका जेष्ठ नागरिक व वयोवृद्ध योजना धारकांना होत आहे. त्यांना बँकेतून पैसे काढण्यासाठी अनेक वेळा फेऱ्या माराव्या लागत आहे. त्यामुळे त्यांच्याकडून संताप व्यक्त होताना दिसतो.

फोटो: केरी सत्तरी येथे भारतीय स्टेट बँकेत सेवेसाठी आलेले नागरिक

Related Stories

No stories found.