राजकीय वक्तव्ये केल्याने भंडारी समाजामध्ये संतापाची लाट

समाजाला गृहीत धरून पदाधिकारी जे वक्तव्ये करत आहेत, त्याला या समाजातील युवकांनी तीव्र आक्षेप घेतला आहे.
Outraged youth of Bhandari community
Outraged youth of Bhandari communityDainik Gomantak

पणजी: गोमंतक भंडारी समाजाच्या कार्यकारी समितीने ज्ञातीबांधवांना विश्‍वासात न घेताच राजकीय वक्तव्ये केल्याने समाजामध्ये संतापाची लाट उसळली आहे. समाजाला गृहीत धरून पदाधिकारी जे वक्तव्ये करत आहेत, त्याला या समाजातील युवकांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. यामुळे या समाजातील दुही चव्हाट्यावर आली आहे.

या समितीने समाजाचा राजकीय लिलाव चालविल्याचा आरोप त्यांनी केला आहे. समाजामध्ये राजकारण आणू नये. या समाजाच्या नेत्यांनी निवडणूक लढविणे व त्यांनी इतरांना पाठिंबा देणे हा त्यांचा वैयक्तिक प्रश्‍न असल्याने समितीने त्यामध्ये हस्तक्षेप न करण्याचा इशारा दिला आहे. या मुद्यावरून रिव्होल्युशनरी गोवन्स संघटनेनेही आक्रमक पवित्रा घेतला असून आम आदमी पक्षापासून गोमंतकीयांनी सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. हल्लीच समाजाचे अध्यक्ष अशोक नाईक यांनी जो राजकीय पक्ष समाजाच्या अधिकाधिक नेत्यांना उमेदवारी देईल, त्याला पाठिंबा देण्याची घोषणा केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी आम आदमी पक्षाने भंडारी समाजाचा मुख्यमंत्री तर ख्रिस्ती धर्मीय उपमुख्यमंत्री असेल, अशी घोषणा केली.

या घटनेनंतर भंडारी समाजाचे ज्ञातीबांधव आणि युवकांमध्ये संतापाची लाट उसळली असून कार्यकारी समितीने समाजाचा राजकीय लिलाव करून राजकारण्यांकडून मलई मिळवण्याचा प्रयत्न सुरू केल्याचा आरोप होत आहे.

विकासाचा अजेंडा घेऊन गोव्यात आलेल्या दिल्लीच्या ‘आप’ने आता धर्माबरोबर समाजात जातीय तेढ निर्माण केले असून ते गोव्यासाठी घातक आहे. ‘आप’ने मुख्यमंत्री पदासाठी भंडारी समाजाचा तर उपमुख्यमंत्री पदासाठी ख्रिस्ती धर्माच्या व्यक्तीची निवड करण्याची केलेली घोषणा गोव्यासाठी मारक आहे. त्यामुळे ‘आप’पासून लोकांनी सावध राहावे.

- मनोज परब, संयोजक, रिव्होल्युशनरी गोवन्स

Outraged youth of Bhandari community
कळंगुटचे गत वैभव पुन्हां परतण्यासाठी एकजुट व्हा : पी. चिदंबरम

समितीमागे राजकीय सूत्रधार

या समाजाच्या नोंदणीचे प्रकरण सध्या जिल्हा निबंधकांकडे प्रलंबित आहे. त्यांनी ते कायदा खात्याकडे पाठविले आहे. या समाजाचे शेड्युल तसेच ऑडिट अपूर्ण आहे. ऑडिट अहवाल पुराव्यासह तयार केला असा दावा समितीने केला असल्यास त्यावर चर्चा करण्याचे आव्हान ॲड. बकाल यांनी दिले आहे. समाजासमोर खोटी माहिती सादर करून दिशाभूल करू नये. या समितीने समाजामध्ये फूट पाडण्याचे तसेच इतर जातींमध्ये अंतर तयार केले आहे. त्यांनी अशा घोषणा करणे लगेच थांबवावे. या समितीमागे राजकीय सूत्रधार आहेत. समाजाला राजकारणात लोटून हे पदाधिकारी समाजाचे नाव बदनाम करत आहेत, असा आरोप बकाल यांनी केला.

अशोक नाईक यांच्यात सरपंच निवडून आणण्याचीही कुवत नाही : अातीश मांद्रेकर

समाजाचे अध्यक्ष अशोक नाईक यांच्यात समाजाला पुढे नेण्याची क्षमता नाही. राज्यात सुमारे 60 टक्के समाजाचे लोक आहेत तर ते अधिकाधिक ज्ञातीबांधवांची नोंदणी का करू शकले नाहीत? राज्यात सरपंच निवडून आणण्याचीही त्यांची कुवत नाही. नवीन सदस्यनोंदणी सध्या बंद ठेवली आहे. ऑडिट अहवाल तयार केला असेल तर तो चर्चेसाठी ठेवावा, असे आतीश मांद्रेकर म्हणाले.

Outraged youth of Bhandari community
Goa Election: 'गोव्यात भंडारी समाजाचा मुख्यमंत्री बनणार'!

दस्तऐवज कोणी हरवले?

ॲड. अनिश बकाल म्हणाले की, गोमंतक भंडारी समाजाची कार्यकारी समितीची मुदत संपून गेली आहे. या समाजाचे नोंदणीचे नूतनीकरण अजून केलेले नाही. नोंदणी दस्ताऐवज हरवल्याची तक्रार आजी व माजी कार्यकारी समितीने पोलिसांत नोंदवली आहे. समाजाच्या नोंदणीचे दस्ताऐवज कोणी हरवले हा प्रश्‍नही उपस्थित होत आहे. या समितीने गेल्या तीन वर्षांच्या कालावधीत (2018-20) मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार व घोळ घातला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com