Goa Crime : गोव्यातील गुन्हेगारीत परप्रांतीयांचे प्रमाण चिंताजनक

2022 मधील गुन्हेगारीच्या घटनांचा आढावा घेतल्यास संशयितांमध्ये परप्रांतीयांचा लक्षणीय सहभाग ही चिंताजनक बाब असल्याचे दिसते.
Goa Crime News| Goa News
Goa Crime News| Goa News Dainik Gomantak

ख्रिसमस पार्टीसाठी पणजीत आलेल्या एका विद्यार्थिनीवर बसमध्ये परप्रांतीय बसचालकाने बलात्कार केल्याची घटना घडली होती. यानंतर राज्यातील गुन्हेगारी क्षेत्रात सक्रीय असलेले परप्रांतीय हा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. 2022 मधील गुन्हेगारीच्या घटनांचा आढावा घेतल्यास संशयितांमध्ये परप्रांतीयांचा लक्षणीय सहभाग ही चिंताजनक बाब असल्याचे दिसते.

गत वर्षीच्या सर्व गुन्हेगारी घटनांचा आढावा घेतल्यास 12 खुनांच्या घटनासह एकूण 115 गंभीर गुन्ह्यात (ज्यात चोऱ्यांचा समावेश नाही) परप्रांतीय आहेत. तर ड्रग्स संदर्भात घडलेल्या एकूण 55 प्रकरणात परप्रांतीय गुंतलेले आहेत. गोवा पोलिसांनी सांगितले, की गुन्हेगारी विश्‍वात बहुतेक कर्नाटक राज्यांतील नागरिकांचा सहभाग आहे.

हे प्रमाण एकूण परप्रांतीय गुन्हेगारांच्या तुलनेत निम्मे आहे. त्या पाठोपाठ उत्तर प्रदेश, बिहार, पश्‍चिम बंगाल, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान, हिमाचल प्रदेश, उडिशा आणि झारखंड या राज्यातील गुन्हेगार आहेत. यातील अनेकजण कामानिमित्त गोव्यातच स्थाईक झाले आहेत.

परप्रांतीयांच्या वस्तीच गुन्हेगारांचे आगार

1 पणजीतील विद्यार्थिनी बलात्कार प्रकरणातील संशयित हा झुआरीनगरच्या झोपडपट्टीत राहणारा आहे. या झोपडपट्टीशी निगडित अनेकांचा यापूर्वी गुन्हेगारी घटनांत समावेश आहे.

2 मडगाव येथील दवर्ली आणि रुमडामळ येथील हाऊसिंग बोर्ड परिसर असाच परप्रांतीयांची दाट लोकवस्ती असलेला भाग असून यातील रुमडामळ येथे मोठ्या प्रमाणावर पीएफआयशी संबंधित लोक सापडले होते.

3 दवर्ली हाऊसिंग बोर्डमध्ये 17 ऑगस्ट रोजी एकाने आपल्याच पत्नीचा मारहाण करून खून केला होता. दुसऱ्या घटनेत अनैतिक संबंध उघडकीस येतील म्हणून काकाने पुतण्याला विहिरीत ढकलून हत्येचा प्रयत्न केला होता.

4 नोव्हेंबर 17 रोजी नेसाय येथे बिहार येथील संदीप गुप्ता याने दिकरपाली येथे रहाणाऱ्या अक्तर रझा या मासे विक्रेत्याच्या पैसे लुटण्याच्या इराद्याने डोक्यात दगड घालून खून केला होता.

5 जुलै 14 रोजी मडगाव येथील आझाद नगरीत झालेल्या एका भांडणात मुक्तार बदानी या युवकाचा खून झाला होता.

6 नुकतेच आंध्र प्रदेश पोलिसांनी आंतरराज्य ड्रग्स टोळी पकडली होती. त्यात वास्कोतील रियाझ शेख याचा समावेश होता. रियाझ हा मूळ बेल्लारी-कर्नाटकचा असून त्याच्यावर गोव्यासह बंगळुरू येथे गुन्हे नोंद आहेत.

Goa Crime News| Goa News
Mahadayi Water Dispute : म्हादईप्रश्‍नी गोव्यातील सर्वपक्षीय नेते एकवटले

गुन्हेगारी रोखण्यासाठी हे उपाय

परप्रांतीयांना घरे भाड्याने देण्यापूर्वी त्यांची पार्श्‍वभूमी तपासावी.

भाडेकरूंची माहिती पोलिसांना द्यावी.

परप्रांतीय काम करताना त्यांच्यावर लक्ष ठेवावे.

परप्रांतीयांच्या वस्त्या असलेल्या ठिकाणांची पोलिसांनी ठराविक कालावधीने पाहणी करावी.

नवीन परप्रांतीय व्यक्ती गावात राहात असल्याचे दिसून आल्यास त्यांची माहिती पोलिसांना द्यावी

परप्रांतीय गुन्हेगारास पकडल्यास त्यांना जामीन देताना कडक अटी घालणे आवश्यक.

राजकारण्यांनी मतासाठी परप्रांतीयांना नको असलेल्या सुविधा देऊ नयेत.

आपल्या फायद्यासाठी परप्रांतीयांच्या गुन्हेगारी कृत्यांवर पांघरूण घालू नये.

गोव्याचे सांस्कृतिक खच्चीकरण

आरजीचे प्रवर्तक मनोज परब यांनी गोव्यात परप्रांतीयांच्या वाढलेल्या वस्ती हीच गुन्हेगारांची मुख्य आश्रयस्थाने असून त्यांच्यामुळे गोव्याचे सांस्कृतिक खच्चीकरण होत असल्याचा आरोप केला. गोव्यातील लोकही या परप्रांतीयांना पाहून त्यांच्यासारखे वागत आहेत. परप्रांतीय हे आता मतपेटी बनल्याने नेतेही त्यांचे चोचले पुरविण्यात मग्न झाले आहेत, अशी खंत परब यांनी व्यक्त केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com