गोवा मेडिकल कॉलेजमध्ये आत्तापर्यंत 1000 आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण

गोमन्तक वृत्तसेवा
रविवार, 31 जानेवारी 2021

गोवा मेडिकल कॉलेज (जीएमसी) आणि हॉस्पिटलमध्ये शनिवारी 121 आरोग्यसेवा कामगारांना कोरोना लसीचा पहिला डोस देण्यात आला.

पणजी : गोवा मेडिकल कॉलेज (जीएमसी) आणि हॉस्पिटलमध्ये शनिवारी 121 आरोग्यसेवा कर्मचाऱ्यांना कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस देण्यात आला. लाभार्थ्यांमध्ये विभाग प्रमुख, सल्लागार, निवासी डॉक्टर, वैद्यकीय व पॅरामेडिकल विद्यार्थी, प्रशासकीय व कारकुनी कर्मचारी, आपत्कालीन विभागाचे कर्मचारी आणि बहु-कार्य करणारे कामगार यांचा समावेश आहे. याचबरोबर गोवा वैद्यकिय महाविद्यालयत कोरोना प्रतिबंधक लस घेणाऱ्यांच्या संख्येने एक हजारांचा टप्पा ओलांडला आहे.

गोवा सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय; सरकारी जागांवर अतिक्रमण झाल्यास अधिकारी...

“लसीकरणानंतर कोणत्याही गंभीर प्रतिकूल घटना नोंदवल्या गेल्या नसून, सर्वांची प्रकृती ठिक आहे,” असे जीएमसीचे लसीकरण नोडल अधिकारी डॉ. जगदीश काकोडकर म्हणाले. प्रतिबंधक औषध विभागाचे प्रमुख डॉ.कोकोडकर, लसीचा हजारावा डोस घेणारे आरोग्य कर्मचारी ठरले.गोवा मेडिकल कॉलेजमध्ये सुरूवातीला आठवड्यातून एक दिवस अशा पद्धतीने ही लसाकरण मोहिम सुरू करण्यात आली होती. हळू हळू ही मोहिम वेगवान करत आता आठवड्यातून चार दिवस लसीकरण होत आहे.

गोवा अडकतोय कर्जाच्या जाळ्यात

एकूण कार्यरत 4500 आरोग्य सेवकांपैकी आत्तापर्यंत 1000 कर्मचाऱ्यांना कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. 15 फेब्रुवारीपर्यंत आम्ही सगळ्या कर्मचाऱ्यांना कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस देण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यानंतर कोरोना प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस देण्याची मोहिम सुरू करण्याचा प्रयत्न करण्यात येईल.

 

 

 

 

संबंधित बातम्या