मार्केटमध्ये रात्रीच्यावेळी मुक्काम करणाऱ्यास लावले पिटाळून

गोमंतक वृत्तसेवा
गुरुवार, 29 ऑक्टोबर 2020

महापालिकेच्या मार्केट इमारतीचे आठ वाजल्यापासून सर्व दरवाजे बंद होतात. पहाटे साडेचार-पाच वाजल्यापासून येथे लोकांची ये-जा सुरु होते. मार्केटचे रात्रीचे दरवाजे बंद होत असतानाही एक महाभागाचा मुक्काम मार्केटच्या पहिल्या मजल्यावर असल्याचे आढळून आले. अखेर बाजार समितीचे अध्यक्ष शेखर डेगवेकर यांनी या महाभागास पिटाळून लावले आहे. 

 पणजी : महापालिकेच्या मार्केट इमारतीचे आठ वाजल्यापासून सर्व दरवाजे बंद होतात. पहाटे साडेचार-पाच वाजल्यापासून येथे लोकांची ये-जा सुरु होते. मार्केटचे रात्रीचे दरवाजे बंद होत असतानाही एक महाभागाचा मुक्काम मार्केटच्या पहिल्या मजल्यावर असल्याचे आढळून आले. अखेर बाजार समितीचे अध्यक्ष शेखर डेगवेकर यांनी या महाभागास पिटाळून लावले आहे. 

पहिल्या मजल्यावर अनेक दुकाने बंद आहेत. एका बंद दुकानगाळ्याच्या शटरच्या बाजूला खिळे ठोकून एका व्यक्तीने आपली कपडे, हांथरून-पांघरून अडकविले होते. त्याशिवाय काही लागणाऱ्या वस्तूही याठिकाणी ठेवल्या होत्या. मार्केट इमारतीत शौचालयाची व्यवस्था असल्याने त्याची कोणतीच अडचण होत नव्हती. दोन दिवसांपूर्वी सकाळी लवकर डेगवेककर यांनी इमारतीत फेरफटका मारला, तेव्हा त्यांना त्या व्यक्ती करिश्‍मा लक्षात आला. 

त्यास येथे कोणी राहण्यास परवानगी दिली, हे काही तो सांगण्यास तयार नव्हता. अखेर डेगवेकर यांनी त्यास सर्व बोझा-बिस्तरा घेऊन पिटाळून लावले. सर्व दरवाजे बंद असताना हा व्यक्ती आतमध्ये कसा राहतो, याचा कोणालाच कशी माहिती नाही याची चर्चा मात्र मार्केट परिसरात होती. याठिकाणच्या दुकानदारही आम्हाला त्याची कल्पना नसल्याचे सांगतात.

संबंधित बातम्या